Jayant Patil : जयंत पाटलांना शिवसेनेत खेचण्याचा डाव, शिंदेंच्या शिलेदाराने निर्धारच केला

Maharashtra Politics: जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरुन मुक्त करण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा बोलून दाखवली होती.
Eknath Shinde & Jayant Patil
Eknath Shinde & Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नसून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी 15 जुलै रोजी मुंबईत पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाटील यांची राजीनामा घ्यायचा की प्रदेशाध्यक्षपदी त्यांना कायम ठेवायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान जयंत पाटील यांच्या नाराजीवरुन राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे. अशातच आता जयंत पाटील हे नाराज असतील आणि अन्य पक्षात जाणार असतील तर त्यांना आमच्या पक्षात आणण्याचे प्रयत्न करु असं शिवसेना (शिंदे) गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरुन मुक्त करण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा बोलून दाखवली होती. मात्र जयंत पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पाटील हे पदावर राहायला इच्छुक नसून त्यांच्या जागेवर आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

परंतु राजीनाम्याची चर्चा हा खोडसाळपणा असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जिंतेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मी त्यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही. वाचलेला नाही. पक्षाची उद्या बैठक आहे, त्यात काय ते कळेल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर भाजपनेही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

मात्र, जयंत पाटील जर नाराज असतील व त्यांना जर दुसऱ्या पक्षात जायची इच्छा असेल तर त्यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु असे सांगत गुलाबराव पाटील यांनी एक प्रकारे पाटली यांनी शिवसेनेत येण्याची अप्रत्यक्ष ऑफरच दिल्याचे दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपच्या पुढे जाऊन डाव टाकल्याचे बोलले जात आहे.

तसेच जिल्हा बँकेकडून बेकायदेशीरपणे १० कोटींचे कर्ज घेतल्याच्या प्रकरणात माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याविषयी विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले, हे प्रकरण केवळ सुरुवात असून, आगामी काळात देवकरांची अनेक प्रकरणं समोर येतील, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com