Jharkhand Assembly Election Results : महाराष्ट्रात पानिपत पण झारखंडमध्ये गड राखला, हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार?

Jharkhand Assembly Election Results JMM BJP : भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत. भाजप हा झारखंड मुक्ती मोर्चानंतर दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र मित्रपक्षांसोबत मिळूनही त्यांना बहुमत गाठता आले नाही.
Hemant Soren
Hemant SorenSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand Assembly Election Results : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा दणकून पराभव होत असताना झारखंडमध्ये मात्र काँग्रेसासाठी खूशखबर आहे. झारखंड मुक्ती मोर्चासह निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पुन्हा सत्तेत आला आहे. सर्वाधिक जागा झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाल्या आहेत.

81 जागा असलेल्या झारखंड विधानसभेतील 33 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा तर 15 जागांवर तसेच मित्रपक्षांसह इंडिया आघाडी 56 जागांवर विजयी झाली आहे.

भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत. भाजप हा झारखंड मुक्ती मोर्चानंतर दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र मित्रपक्षांसोबत मिळूनही त्यांना बहुमत गाठता आले नाही.

Hemant Soren
National Election Watch: भाजपच्या 75 उमेदवारांचे लीड घटले; गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

हेमंत सोरेने पुन्हा मुख्यमंत्री?

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कथित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना निवडणुकीच्या आधी तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री नेमले मात्र तुरुंगातून ते परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेतले होते. चंपई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा निकाल झारखंज मुक्ती मोर्चाच्या बाजुने लागल्याने हेमंत सोरेन हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

राहुल गांधी काय म्हणाले?

झारखंडमधील विजयाबाबत राहुल म्हणाले की, इंडिया आघाडीला बहुमत दिल्याबद्दल झारखंडमधील लोकांचे मनापासून आभार. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विजयानिमित्त शुभेच्छा. राज्यातील आघाडीचा हा विजय संविधानाच्या विजयाबरोबरच जल-जंगल-जमीनीच्या रक्षणाचा विजय आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

Hemant Soren
Sillod Assembly Constituency Result News : सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तारच, पण बनकरांनी त्यांना घाम फोडला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com