Jitendra Awhad : 'रागात असलो तरी 'अजित' म्हणणार नाही', जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Jitendra Awhad Viral Chat Ajit Pawar : आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, माझा खोटा व्हाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता स्पष्ट दिसत आहे.
Jitendra Awhad and Ajit Pawar
Jitendra Awhad and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad : संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते. त्यांनी भाषण करताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, या सभेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या व्हाॅटसअप चॅटचे स्क्रीनशाॅट व्हायरल होत आहे. हे स्क्रीनशाॅट बनावट असल्याचे आव्हाड यांनी सांगत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

व्हायरल झालेल्या स्क्रीनशाॅटमध्ये आव्हाड यांनी अजित पवार यांचा 'अजित' असा एकेरी उल्लेख केल्याचे दिसते आहे. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हे खोटे वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची पोलखोल केली आहे.

Jitendra Awhad and Ajit Pawar
BJP Election : भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष कधी मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर

ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, माझा खोटा व्हाॅटसअप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा... माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,"आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे", असे अनुद्गार काढले. तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर "पॅशन" असे म्हणत हा डीपी मी ठेवलेला आहे.

'मी कितीही रागात असलो, संतापलेलो असलो तरी 'अजित' असे कधीच म्हणत नाही. मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर 'अजितदादा' असे म्हणतो. हे आता मखलाशी, मस्का पाॅलिसीसाठी लिहीत नाही. मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो', असे ट्विटमध्ये मला लक्ष्य करण्यासाठी खोटं लिहिले आणि एक्स्पोज झाले.

अजितदादांना माहीत नसेल

या खोट्या चॅटसाठी कामाला लागलेली टीम अजितदादा यांना माहितही नसेल. पण, असे काही तरी उद्योग करून अजितदादांकडून स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठीच हा बालहट्ट केला अन् स्वतःच्याच पायात पाय अडकून उताणे पडले. खोटे करायलाही डोके लागते.', असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. आव्हाड यांनी म्हटले आहे.'

Jitendra Awhad and Ajit Pawar
Rupali Patil FIR : आता होईल 'दूध का दूध और पानी का पानी'! गुन्हा दाखल होताच रुपाली पाटील काय म्हणाल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com