Jogendra Kawade and Mahayuti : बच्चू कडूंनंतर जोगेंद्र कवाडेंनीही वाढवलं महायुतीचं टेन्शन; जाहीर केला 'हा' निर्णय!

Jogendra Kawade on Vidhan sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांनी किती जागा लढवणार याची जाहीरपणे मागणी करण्यास सुरुवात केली आहे.
Jogendra Kawade
Jogendra KawadeSarkarnama
Published on
Updated on

Jogendra Kawade and Maharashtra Assembly Elections : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वेध सर्वच पक्षांना लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील लहान-मोठ्या पक्षांनी आपपाल्या जागांचा आकाडा पुढे करण्यास सुरूवात केली आहे.

या जागांच्या आकड्यांनी महायुतीत सर्वाधिक टेन्शन आहे. महायुतीमधील 'प्रहार'चे बच्चू कडू यांच्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांनी आपल्या जागाचा आकडा सांगितला आहे. यामुळे महायुतीत जागा वाटपाचं टेन्शन राहणार आहे.

लोकसभेनंतर महायुती विधानसभेला कशी समोरे जाणार, याची गणितं वरिष्ठ नेते आखत आहेत. यात महायुतीमधील प्रत्येक मित्रपक्ष आपपाल्या जागा जाहीरपणे सांगत सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गट, आरपीआयचे रामदास आठवले, प्रहारचे बच्चू कडू यांनी विधानसभेला किती जागा पाहिजेत, हे जाहीरपणे सांगत सुटले आहे.

Jogendra Kawade
Pune Politics : आता माजी नगरसेवकांना आमदार व्हायचंय! पुण्यात चुरस वाढणार; काय आहे कारण?

महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष भाजपने (BJP) अजून तरी आकड्याचे गणित मांडलेले नाही. यातच जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाने उडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत योग्य सन्मान न मिळाल्यास आम्ही 30 जागा लढू, असे जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) यांनी म्हटले आहे.

जोगेंद्र कवाडे म्हणाले, "आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा हव्यात. महायुतीत सन्मान मिळालाच पाहिजे. महायुतीत योग्य जागा न मिळाल्यास आम्ही 30 जागा लढू".

मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमच्या वाट्याला दोन मंत्रिपदे पाहिजेत. आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तारात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व हवे आहे.' असे जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले.

Jogendra Kawade
Ajit Pawar : लोकसभा निकालानंतर अजितदादांचे आमदार अलर्ट! अधिवेशनात 'हॉट इश्यू' लावून धरणार...

याशिवाय आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. या सरकारने शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. लोकसभेच्या निवडणुका आता संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात, याचे भान ठेवून कुणीही दुखावणार नाही, याची काळजी आता सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com