

Kalpna Kharat: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचा लैंगिक छळ तसंच अत्याचार प्रकरणी अटक झाली आहे. त्याच्याकडून ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. याच अशोक खरातची पती कल्पना खरात यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आपला पती कुठल्या प्रकारे तज्ज्ञ किंवा व्यावसायिक ज्योतिषी नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पतीविरोधात केलेल्या कारवाईवरुन अनेक आरोपही केले आहेत.
कल्पना खरात यांनी म्हटलं की, ''माझे पती हे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक ज्योतिषी नाहीत. त्यांच्या जवळच्याच सहकाऱ्यांनी त्यांचा घात केला असून समाजात असलेली त्यांची प्रतिमा उद्धवस्त करण्यासाठी हे कारस्थान रचलं गेलं आहे,'' अशी प्रतिक्रिया कल्पना अशोक खरात यांनी दिली आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'नं याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खऱात हे दाम्पत्य स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु म्हणून समाजात वावरत होते. कारण गुरुपौर्णिमेनिमित्त या दोघांचंही पाद्यपुजन सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. त्याचबरोबर खरातनं जी काही माया अर्थात पैसा जमा केला आहे तो त्यानं आपल्या पत्नीसह दोन मुली आणि जावयाच्या नावे केल्याचंही समोर आलं आहे. कोट्यवधी रुपयांचे भूखंड, हार्डवेअरचं भलंमोठं शोरुम त्याचबरोबर आलिशान फार्म हाऊस, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक अशी बरीच मोठी संपत्ती त्यानं आपल्या नातेवाईकांच्या नावावर केली आहे.
अशोक खरात याला आध्यात्मिक गुरु मानलं असल्यानं त्याच्याशी संबंधित अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो समोर आले आहेत. त्याचबरोबर अशोक खरात अध्यक्ष असेलल्या शिवनिका संस्थान ट्रस्टच्या एका ट्रस्टी म्हणून देखील रुपाली चाकणकर या कार्यरत होत्या. त्याचबरोबर २०२२ मध्ये नाशिकच्या एका स्थानिक वर्तमानपत्रानं खरातच्या काळ्या कारनाम्यांबाबत बातमी दिल्यानं खरातची कथित बदनामी केल्याप्रकरणी त्या वर्तमानपत्राला कारणे दाखवा नोटीस पाठवून दबाव आणल्याचा आरोपही रुपाली चाकणकर यांच्यावर झाला. यासर्व प्रकारामुळं अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.