

Nashik Politics : नाशिक महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील खड्डे व अनियमित पाणीपुरवठा या विषयावर चर्चा करण्यासाठी आज शुक्रवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाण्याच्या प्रश्नावरून महापालिकेत बराच गोंधळ बघायला मिळाला.
भाजपाच्या नगरसेविका प्रियांका माने या थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात पोहोचल्या. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात पाणी नसल्याने प्रियंका माने आक्रमक झाल्या होत्या. माझ्या प्रभाग क्रंमाक ३ मध्ये मी गेल्या तीन वर्षांपासून पाण्यासाठी पाठपुरवठा करत आहे. आमच्या प्रभागातील हक्काच्या निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची चोरी तत्काळ थांबवावी व आमच्या प्रभाग क्रं ३ मधील जलकुंभात तत्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु करावा अशी मागणी प्रियंका माने यांनी यावेळी केली.
आमच्या हक्काचे पाणी द्वारका तसेच दुसऱ्या प्रभागात चोरलं गेलं आहे असा माझा आरोप असल्याचं प्रियंका माने म्हणाल्या. माझ्या प्रभाग क्रंमाक ३ मधील माता-बघिनी, वयस्कर महिला सकाळी उठल्यापासून पाण्यासाठी वणवण करत असतात. मला त्यांची वणवण बघवत नाही. प्रशासन काय झोपलंय का? असा सवाल प्रियंका माने यांनी व्यक्त केला. प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी त्यांनी केली.
माने नगरमध्ये तीन वर्ष झाले जलकुंभ उभारले आहे. पण आज ती टाकी रिकामी केवळ शो म्हणून उभी आहे. आज तिथं पाणी नाही. अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की, पाणी नाही. मग जलकुंभ उभारण्यासाठी पालिकेने एवढा खर्च कशासाठी केला? आमच्या हक्काचं पाणी द्वारकेला चोरी केलं जात आहे. त्यांच्या घरात दोन-दोन वेळा पाणी सोडलं जातं. आमच्या प्रभाग ३ मध्ये एक वेळही पुरेसे पाणी मिळत नाही.तीन वर्षांपासून पाण्याची समस्या असल्याचं प्रियंका माने म्हणाल्या.
दरम्यान नाशिकच्या सातपूर परिसरातील जलवाहिनीत थेट मेलेल कबूतर आढळल्याचे काही फोटो सभागृहात दाखवण्यात आले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नगरसेवक विश्वास नागरे आणि माधुरी बोलकर आक्रमक झाले. तर प्रभाग २५ च्या भाजप नगरसेविका साधना मटाले यांनी चक्क दूषित पाण्याच्या बॉटल महासभेत आणल्या होत्या. त्यांनी नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी केली. दरम्यान नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या या गलथान कारभारावरून नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.