Shiv Sena UBT meeting : कल्याण डोंबिवली महापौर पदाबाबत मोठा ट्विस्ट; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Kalyan Dombivli mayor election News : रविवारी कल्याण डोंबिवली महापौर पदाबाबत मातोश्रीवर नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठ दिवसाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्याप काही महापालिकेतील सत्ता समीकरण रखडले आहे. विशेषतः काही ठिकाणी आकड्याचे गणित जुलै नसल्याने महायुतीमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. त्यामुळे त्रिशंकू असलेल्या महापालिकेत एकीकडे भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जुळवाजुळव सुरु आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच रविवारी कल्याण डोंबिवली महापौर पदाबाबत मातोश्रीवर नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, येथील महापालिकेत घोडेबाजार पहायला मिळत असल्याची भावना यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केली. तसेच, विरोधी बाकावर बसण्याचा पक्षाचा निर्णय मान्य असल्याच नगरसेवकांनी स्पष्ट केले. शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षाचे जे 4 नगरसेवक आमच्यासोबत होते त्यांनी अजून नोंदणी केली नाही. मात्र पुन्हा बैठक घेऊ आणि जर ते आले नाही तर कारवाई करण्याचा इशारादेखील या बैठकीवेळी देण्यात आला.

Uddhav-Thackeray
MNS Politic's : कल्याण डोंबिवलीमधील निर्णयाबाबत ठाकरेंच्या शिलेदाराने मनसेला सुनावले; ‘किमान आमच्याशी चर्चा करायला हवी होती’

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय आणि सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या. येथील महानगरपालिकेतील मोठा घोडेबाजार टाळण्यासाठी नगरसेवकांनी पक्षप्रमुखांकडे मागणी केली आहे. तसेच, केडीएमसी महापालिकेत शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षात बसेल, अशी माहिती आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली.

Uddhav-Thackeray
Shivsena-BJP News : नांदेड-वाघाळा महापालिकेत शिवसेनेची फरपट, भाजपला गरज नसतांना विनाअट पाठिंबा! कल्याणकर युतीत, तर पाटील, बोंढारकर, कदम अलिप्त..

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप (BJP) महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. येथे, भाजप महायुतीने वर्चस्व मिळवले असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी नगरसेवकांची गरज आहे. त्यातच, मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला होता.

Uddhav-Thackeray
Shivsena-BJP News : नांदेड-वाघाळा महापालिकेत शिवसेनेची फरपट, भाजपला गरज नसतांना विनाअट पाठिंबा! कल्याणकर युतीत, तर पाटील, बोंढारकर, कदम अलिप्त..

यावेळी बैठकीत शिवसैनिकांनी सांगितले की, आम्ही ही संपूर्ण निवडणूक शिंदेसेना आणि भाजपा विरोधात लढलो. आमचे नगरसेवक 5-6 हजारांच्या फरकांनी निवडून आले. त्यामुळे, या दोन्ही पक्षांसोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही बसणार अहोत. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती या बैठकीनंतर वरुण सरदेसाई यांनी दिली.

Uddhav-Thackeray
Rais Shaikh : महाराष्ट्रात 'उत्तर भारतातील' पक्षाचा पहिला महापौर बसणार? : काँग्रेस अन् NCP प्लसमध्ये; समाजवादी पक्षाचा आमदार 'किंगमेकर'

'त्या' चार नगरसेवकांवर कारवाई करणार

मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. शिवसेना उबाठा पक्षाचे जे 4 नगरसेवक आमच्यासोबत होते त्यांनी अजून नोंदणी केली नाही. मात्र पुन्हा बैठक घेऊ आणि जर ते आले नाही तर कारवाई करू. कारण, त्यांनी आमच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मग तुम्ही पुढील 5 वर्षात मतदारांना कसं सामोर जाणार आहात, असा सवालही सरदेसाई यांनी नॉट रिचेबल नगरसेवकांना विचारला आहे.

Uddhav-Thackeray
Congress Politics: मोठा राजकीय भूकंप..! काँग्रेसच्या बड्या नेत्यानं पक्ष फोडला, एकाचवेळी 24 माजी आमदार फुटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com