Shiv Sena MLA : शिवसेनेच्या तरुण तडफदार माजी आमदाराचे निधन : लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Shiv Sena ex MLA passes away : मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवसेनेच्या तरुण व तडफदार माजी आमदारांचे निधन झाले.
Shiv Sena MLA : शिवसेनेच्या तरुण तडफदार माजी आमदाराचे निधन : लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Published on
Updated on

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच शिवसेनेतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच यवतमाळ जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

विश्वास नांदेकर हे काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shiv Sena MLA : शिवसेनेच्या तरुण तडफदार माजी आमदाराचे निधन : लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Satish Chavan News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संभाजीनगरमध्ये कात टाकली; नेतृत्व बदलताच जिल्ह्यात पक्ष दुसऱ्या क्रमांकावर!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ डिसेंबर रोजी रुग्णालयात जाऊन विश्वास नांदेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली होती. त्या भेटीदरम्यान नांदेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसून येत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विश्वास नांदेकर यांनी केले होते. शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. ते आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवत असत. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा क्षेत्राच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Shiv Sena MLA : शिवसेनेच्या तरुण तडफदार माजी आमदाराचे निधन : लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Sandeep Kshirsagar : आमदार संदीप क्षीरसागरांचा बीडमध्ये 'स्ट्राईक रेट' घसरला; एमआयएमचा पतंगही उडाला नाही!

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि प्रकृती अधिक खालावली. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. विश्वास नांदेकर यांच्या निधनाची बातमी वणी परिसरात पोहोचताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर वणी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com