Rohit Pawar : 'मागच्या दाराने आमदार कशासाठी झालेत हे सर्वांना माहीत', रोहित पवारांनी राम शिंदेंना डिवचले

Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत-जामखेड एमआयडीसीचा प्रश्न या अधिवेशनात सुटला नाही तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसण्याचा इशाऱ्यावर आमदार रोहित पवार ठाम आहेत. महायुती सरकारने पुन्हा आमची फसवणूक केल्यास आमची लोकं त्यांना सोडणार नाही, असेही पवार यांनी म्हटले.
Rohit Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Ram ShindeSarkarnama

Rohit Pawar News : कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून आमदार रोहित पवार आणि आमदार प्रा. राम शिंदे विधीमंडळ परिसरात माहिती देत आहेत. त्यातून दोघांमध्ये वाद चिघळत आहेत. राम शिंदे यांनी रोहित पवारांना सरकारमध्ये नेमके काय चालले आहे, हे कळत नसल्याचा टोला लागवला होता. तर, रोहित पवारांनी या टोल्याची सुतासह परतफेड केली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, ते मागच्या दरवाजाने आमदार झालेले आहेत. मी त्यांच्या विरोधात आहे. मी सरकार विरोधात बोलतो. म्हणून कदाचित त्यांना विधान परिषदेमधून आमदारकीची भेट देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली असावी.

मी सभागृहात काय बोलतो त्यांना कळत नसावे. नीट माहिती घेत नसावे. आत चर्चा काय होते. त्यांना कळत नाही. एमआयडीसीबाबत मी अधिवेशनात किती वेळा बोललो. मंत्री महोदयांनी त्यावर काय उत्तर दिले, याची माहिती घ्यावी. मग त्यांना काही गोष्टी कळतील.

एमआयडीसीबाबत मी ठाम आहे. उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यावर मी ठाम आहे. पुढील आठवड्यात मी विधीमंडळात आंदोलनाला बसणार म्हणजे बसणार, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. "मी दिलेला शब्द पाळत असतो.

पण सरकारने दिलेला शब्द पाळला का? महायुतीचे सरकार शब्द देते परंतु पाळत नाही, असे पुन्हा एकदा झाल्यास आमच्या एमआयडीसीबाबत केल्यास आमची लोक त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी दिला.

Rohit Pawar, Ram Shinde
Team India : रोहित शर्मासह टीम इंडियातील चार खेळाडू एकनाथ शिंदेंना भेटणार; पहिल्यांदाच येणार विधिमंडळात

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून राजकारणाचा प्रयत्न होतो आहे. महायुती सरकार दुसरं काहीच करू शकत नाही. फक्त राजकारण करू शकते. मला डावलण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सर्वजण पाहत आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला दाखवून दिले आहे.

पुढील चार महिन्यात महाविकास आघाडीचे MVA सरकार येईल, तेव्हा मात्र एमआयडीसीचा प्रश्न कसा वेगाने मार्गी लागतो, हे त्यावेळी महायुती विरोधक म्हणून त्यावेळी पाहतील, असेही आमदार रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.

Rohit Pawar, Ram Shinde
Sunil Kedar : सुनील केदारांचे राजकीय भवितव्य आता ‘सुप्रीम’च्या हाती!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com