Team India : रोहित शर्मासह टीम इंडियातील चार खेळाडू एकनाथ शिंदेंना भेटणार; पहिल्यांदाच येणार विधिमंडळात

Eknath Shinde Rohit Sharma, Suryakumar Yadav Shivam Dubey Yashasvi Jaiswal : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी खेळाडूंना भेटीचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारल्याचे सांगितले.
Rohit Sharma, Eknath Shinde
Rohit Sharma, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : टीम इंडियाने टी20 विश्वचषक पटकावल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी मायभूमीत पाय ठेवले. वादळामुळे बारबाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात येतात दिल्लीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज संपूर्ण टीम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.

मुंबईत गुरूवारी सायंकाळी टीम इंडियाची दिमाखदार मिरवणूक काढण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह विश्वविजेत्या संघातील चार खेळाडू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma, Eknath Shinde
Kirodi Lal Meena : भाजपला धक्का; राजस्थानच्या कृषिमंत्र्यांचा सर्व पदांचा राजीनामा

शिवसेनेचे नेते व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रताप सरनाईक यांनी चार खेळाडूंना निमंत्रण दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, टीम इंडियातील रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे चार खेळाडू मुंबईतील आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

चारही खेळाडूंनी भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे ते शुक्रवारी पहिल्यांदाच विधिमंडळात येणार आहेत. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंनाही त्यातून प्रोत्साहन मिळेल. त्यांच्या भेटीची वेळ अद्याप ठरलेली नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Rohit Sharma, Eknath Shinde
Rahul Gandhi : लोकसभेतील भाषण राहुल गांधींना भोवणार? केंद्रीय मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत

दरम्यान, विश्वविजेत्या संघाचे दिल्ली विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तिथून बसमधून त्यांनी हॉटेल आयटीसी मौर्या गाठले. हॉटेलमध्येही अनोख्या पध्दतीने टीमचे ढोलच्या गजरात स्वागत करण्यात आले. कॅप्टन रोहितसह इतर काही खेळाडूंनीही भांगडा करत आनंद साजरा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com