Murder Case : अनेकदा समजावूनही २४ वर्षीय विवाहिता पतीला सोडून प्रियकरासोबत राहायला गेली; कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल; थरकाप उडवणारी घटना

Shocking killing in Karnataka linked to Maharashtra : शेजारी असणार्‍या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात असणाऱ्या हुक्केरी तालुक्यातील नदिगुडी परिसरात ‘क्रूर खूना’ची घटना घडली आहे. येथे एका विवाहितेचा खून तिच्याच कुटुंबीयांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
murder case
murder caseSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्नाटकात विवाहित महिलेचा कुटुंबीयांनी ऑनर किलिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  2. प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा खून झाल्याचा आरोप आहे.

  3. या घटनेचा संबंध महाराष्ट्रातील शिरोळशी असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Karnataka crime news : महाराष्ट्राच्या शेजारी असणार्‍या कर्नाटक राज्यात खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या एका विवाहितेचा खून तिच्याच कुटुंबीयांनी क्रूरपणे केला आहे. तर या घटनेचे थेट संबंध महाराष्ट्रातील शिरोळचा असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेचा काका, सख्खा भाऊ आणि मेव्हणा अशा तिघांना अटक केली आहे.

हुक्केरी तालुक्यातील नदिगुडी परिसरात कौटुंबिक प्रतिष्ठा आणि सामाजिक दबावाच्या नावाखाली ही घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तर पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या २४ वर्षीय विवाहितेला कुटुंबीयांनी विष पाजून ठार मारले. तर पुरावा नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील आरग या गावात मृतदेह स्मशानभूमीत जाळला. ही घटना यमकनमर्डी पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेचा काका, सख्खा भाऊ आणि मेव्हणा अशा तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांत प्रकाश भीमप्पा हेळवर (वय ४६), शानूर सदाशिव हेळवर (वय ३५) आणि कल्लाप्पा मायाप्पा हेळवी (वय ४०) यांचा समावेश आहे. सत्यव्वा संतोष हेळवर (२४) असे मृत विवाहितेचे नाव असून ती हुक्केरी तालुक्यातील नदिगुडी परिसरातील रहिवासी आहे.

सत्यव्वाचा विवाह रायबाग तालुक्यातील हणबरट्टी गावातील संतोष हेळवर याच्याशी झाला होता. विवाहानंतर तिचे नदिगुडी परिसरातील कृष्णा सहदेव पाटील याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तिने पतीपासून वेगळे होत प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ फेब्रुवारी २०२६ पासून बेळवडी गावात कोणाला काही न सांगता राहू लागले.

शिरोळला नेऊन समजूत, दुसऱ्या विवाहाचा दबाव

१३ मार्च रोजी कुटुंबीयांनी सत्यव्वाचा शोध लावला. तिला महाराष्ट्रातील शिरोळ येथे काही दिवस ठेवले. कुटुंबीयांनी आपल्या समाजातील दुसऱ्या युवकासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, सत्यव्वाने प्रस्ताव फेटाळून लावला. यानंतर आरोपींचा संताप अनावर झाला. आरोपींनी सत्यव्वाला आरग परिसरात नेले. तेथे मध्यरात्री जबरदस्तीने विष पाजून तिचा खून केला. मृत्यू झाल्यानंतर कोणताही पुरावा शिल्लक राहू नये, या उद्देशाने आरोपींनी मृतदेह आरग येथील स्मशानभूमीत जाळून टाकला.

यमकनमर्डी पोलिस ठाण्यात सत्यव्वा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी अत्यंत चाणाक्षपणे तपासाची सूत्रे हलवली. त्यांनी तरुणीच्या आईला विश्वासात घेऊन चौकशी केली. ‘घडलेली घटना आम्हाला माहीत आहे, नेमके काय झाले ते सांगा’, असे सांगितल्यानंतर आईने संपूर्ण कट उघड केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली.

FAQs :

1. ही घटना कुठे घडली आहे?
ही घटना कर्नाटक राज्यात घडली आहे.

2. ऑनर किलिंग का करण्यात आले?
महिलेने प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुटुंबीयांनी हा गुन्हा केल्याचा आरोप आहे.

3. या प्रकरणाचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?
या घटनेतील काही संबंध महाराष्ट्रातील शिरोळशी असल्याचे समोर आले आहे.

4. ऑनर किलिंग म्हणजे काय?
कुटुंबाच्या तथाकथित सन्मानासाठी केलेली हत्या म्हणजे ऑनर किलिंग.

5. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com