Sharad Pawar Village : पवारांची काटेवाडी होणार ‘स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज’ : महाराष्ट्रातील पहिल्या गावाचा बहुमान

Kathewadi Smart Village: राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार यांचे मूळ गाव काटेवाडी महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होणार आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

SSharad Pawar Village : पवार कुटुंबियांचे मूळ गाव काटेवाडी महाराष्ट्रातील पहिले ‘स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज’ होणार आहे. गावाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा हा अभिनव उपक्रम नुकताच सुरु झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेचा भाग असलेल्या या उपक्रमात शेती, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात किमान 10 स्मार्ट व्हिलेज विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 3500 हून अधिक गावांना स्मार्ट केले जाणार आहे. व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस आणि 24 भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. काटेवाडीतील यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यातील इतर गावांसाठीही हा प्रकल्प आदर्श ठरेल, असा आशावाद आहे.

स्मार्ट गावात काय होणार?

पहिल्या टप्प्यात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. हाय-स्पीड इंटरनेट, स्मार्ट डिव्हायसेस आणि डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुकर होईल. तसेच गावातील महिलांना डिजिटल साक्षरता आणि ऑनलाइन व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. याशिवाय, सौरऊर्जा आणि पर्जन्य जल साठवण यासारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांवरही भर दिला जाईल.

Sharad Pawar and Ajit Pawar
Satara Politic's : कऱ्हाडमध्ये कट्टर विरोधकांची हातमिळवणी; शिंदेंच्या शिलेदाराने टायमिंग साधत केले बेरजेचे राजकारण....

शेतीही होणार हायटेक :

शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सेन्सर्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होईल. यामुळे हवामान, मातीची गुणवत्ता आणि पिकांच्या वाढीची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळेल. शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्ला उपलब्ध होईल. यामुळे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच, शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले जाणार आहेत.

Sharad Pawar and Ajit Pawar
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ ठरणार पुणेकरांसाठी 'गेमचेंजर'; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला नेमका कसा होणार फायदा?

आरोग्य अन् शेती क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार :

आरोग्य सेवांसाठी टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध होईल. यामुळे गावकरी मोबाईल ॲपद्वारे डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकतील. गावात डिजिटल हेल्थ सेंटर्स उभारली जातील. या सेंटर्समध्ये नियमित तपासण्या आणि औषधांचा पुरवठा होईल. शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन क्लासरूम आणि डिजिटल लायब्ररी स्थापन केल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल आणि शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण दिले जाईल. विशेषतः मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजीटल साधनांचा वापर केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com