Satara Politic's : कऱ्हाडमध्ये कट्टर विरोधकांची हातमिळवणी; शिंदेंच्या शिलेदाराने टायमिंग साधत केले बेरजेचे राजकारण....

Karad Municipal Election : कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या वाढदिवशी कट्टर विरोधक इंद्रजीत गुजर यांच्याशी मनोमिलन झाले. आगामी पालिका निवडणुकीसाठी ही महत्वाची राजकीय घडामोड मानली जाते.
Rajendra Yadav-Indrajit Gujar
Rajendra Yadav-Indrajit Gujar Sarkarnama
Published on
Updated on
  1. कऱ्हाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी वाढदिनी आपले कट्टर विरोधक इंद्रजीत गुजर यांच्याशी मनोमिलन करून आगामी निवडणुकांसाठी गटबांधणी मजबूत केली.

  2. जानेवारी 2026 पूर्वी नगरपालिका निवडणुका होणार असून दोन सदस्यीय प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू आहे व हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे.

  3. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक आघाड्यांची मोर्चेबांधणी सुरू असून डॉ. अतुल भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

Karad, 20 September : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो, त्याचे प्रत्यंतर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या वाढदिनी आले. त्यांचे कट्टर विरोधक आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले युवा नेते इंद्रजीत गुजर यांचे मनोमिलन झाले. यादव यांनी वाढदिनी आपला एक कट्टर विरोधक कमी करुन बेरजेचे राजकारण करत आपल्या गटाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न चालवला आहे. या दोघांचे मनोमिलन हे नगरपालिका निवडणुकीसाठी महत्वाची घडामोड मानली जात आहे.

नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी (municipal election) जानेवारी २०२६ ची डेडलाईन न्यायालयाने दिली आहे. दोन सदस्यीय प्रभाग रचना करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याची कार्यवाही नगरविकास विभागाने सुरू करुन त्यावर हरकती मागवल्या असून १५ हरकती आल्या होत्या. त्यावर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर याच्या उपस्थितीत सुनावणीही घेण्यात आली आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाज सुरू झाल्याने इच्छुकांनीही वातावरण निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. नगरपालिकेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी एकीकडे सुरु असतानाच कऱ्हाड (Karad) नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी त्यांचा एक कट्टर विरोधक कमी करुन वाढदिनीच बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.

यादव यांच्या विरोधात मागील निवडणुकीत स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा असलेल्या कुटुंबातील युवा नेते इंद्रजीत गुजर यांनी निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्या दोघांच्या गटात जोरदार टक्कर झाली होती. त्यावेळच्या वातावरणामुळे यादव आणि गुजर हे आयुष्यभरासाठी एकमेकांपासून दूर गेल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे.

मध्यंतरी या दोन्ही नेत्यांची शहरानजीकच्या एका आलिशान हॉटेलमध्ये बैठक झाली होती. त्यात जुनी उणीदुणी विसरून पुढे एकत्र काम करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. या वाढदिवसाला बेरजेच्या राजकारणाची झालर लागल्याचे दिसून आले. त्यांच्या वाढदिनीच या दोन्ही युवा नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे पहायला मिळाले.

Rajendra Yadav-Indrajit Gujar
Karmala Politic's : ‘आज याला बघूनच घेतो’; शिवसेनेच्या दिग्विजय बागलांची जिल्हाप्रमुख महेश चिवटेंना दमबाजी, पोलिसांत तक्रार

कराडच्या राजकारणातील हे दोन युवा नेते व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसून चर्चा करतानाचे दृश्य पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही राजकीय घडामोड कऱ्हाड नगरपालिकेच्या आगामी राजकारणात यादव यांच्या गटासाठी महत्वाची मानली जात आहे.

आघाड्यांचे राजकारण

कऱ्हाड नगरपालिकेची निवडणूक अपवाद वगळता विविध आघाड्यांच्या माध्यमातून लढवली गेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आतापर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सख्य असलेली जनशक्ती आघाडी, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी, शिवसेनेचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची लोकसेवा आघाडी आदी आघाड्यांच्या माध्यमातून लढल्या गेल्या आहेत.

Rajendra Yadav-Indrajit Gujar
Solapur ZP : प्रतापसिंह मोहिते पाटलांनी मराठा-ओबीसी केमिस्ट्री जुळवली अन्‌ जिल्हा बॅंकेचे शिपाई नारायण खंडागळे ZP अध्यक्ष बनले

कोण-कोणाला साथ देणार?

या आघाड्यांकडूनही आगामी पालिका निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, कोण-कोणाला साथ देणार? भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भूमिका या वेळी काय राहणार, यावरही राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत, त्यामुळे नेत्यांची भूमिका काय राहणार, याकडेही कऱ्हाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com