Thackeray Group : कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंची फिल्डिंग; पण उमेदवार कोण असणार?

Aaditya Thackeray Konkan Daura : आदित्य ठाकरे यांचे कोकणात सिंधुदुर्गमधील दोडामार्गमध्ये जोरदार स्वागत झाले. आदित्य ठाकरेंनी खळा बैठका घेत संवाद साधला...
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : आदित्य ठाकरे हे आज आणि उद्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंचा हा दौरा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आहे. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीत जिंकायचं हे ठरवून आपण पदवीधर निवडणुकीत उतरलो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray
Thackeray Group : ठाकरेंची पवारांवर कडी; रायगडमधून लोकसभेसाठी अनंत गीतेंच्या नावाची घोषणा

कोकण पदवीधर मतदारसंघ आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. शिवसैनिक आता पेटून उठले आहेत. तुम्ही मेहनत घेतली तर ही निवडणूक आपण जिंकणारच आहोत. एवढचं नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आपण जिंकणार म्हणजे जिंकणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा उद्या करण्यात येणार आहे.

उद्धवसाहेब यांच्या बद्दल जनतेत क्रेझ निर्माण होत आहे. येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीत आहे. सद्या १६ आमदार आमचे आहेत. पण नक्की याचे १६० आमदार होतील, असे ते पुढे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानपरिषद सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. मी खळा बैठका घेतोय, कारण तुमच्यापर्यंत पोचायचे आहे. तुमच्या घरी येऊन मला विंनती करायची होती म्हणून मी तुमच्या घरी आलोय. कोकणात पर्यटन विकास होऊ शकतो.मात्र याकडे कोणाचा लक्ष नाहीये. कोकणी माणसाला इथे रोजगार मिळू शकेल. मात्र त्यासाठी गरज मानसिकता बदलण्याची गरज आहे.

महाराष्ट्र एक वेगळ्या परिस्थितीतून जातोय. आम्ही विधानसभेत सातत्याने लढतोय. खोक्याचे सरकार धोक्याने तयार झाले आहे. आपले राजकीय शत्रु कोण आहेत हे ओळखलं पाहीजे. हे खोके सरकार आल्यापासून एकही चांगला उद्योग आला नाही. चांगले उद्योग गुजरातला नेले. कोकणात जे नको ते रीफायनरी सारखे प्रकल्प दिले जातायेत. 31 डिसेंबर ला हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार आहे. आमि 2024 मध्येह आपलचं सरकार येणार आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray News : राणेंच्या कोकणात आदित्य ठाकरे काय नवीन बॉम्ब टाकणार? दोन दिवसांचा दौरा चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com