Lok sabha Election Maharashtra : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे पक्षाचे नेते अनंत गीते यांनी मोठी माहिती दिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप घोषित झालेले नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून रायगडमधून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
अनंत गीते हे रमाधाम वृद्धाश्रमाच्या बैठकीसाठी आले. या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी, आमदार हजर राहणार असल्याची माहिती गीते यांनी दिली. बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. रायगड जिल्ह्यात बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनंत गीते यांनी मोठे विधान केले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उबाठा गटाचा उमेदवार उद्या जाहीर केला जाईल, अशी माहिती अनंत गीते यांनी दिली आहे.
रायगड मतदारसंघातून स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे. आता रायगडचा खासदार ठाकरे गटाचा होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अनंत गीते हे आता रायगडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे सुनील तटकरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता. 31, 438 मतांनी गीते यांचा पराभव झाला होता. गेल्या निवडणुकीत रायगड मतदारसंघात 61.77 टक्के मतदान झाले होते. रायगड लोकसभा मतदारसंघात श्रीवर्धन, गुहागर, महाड, दापोली, अलिबाग, पेण हे विधानसभा मतदारसंघ येतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.