Aaditya Thackeray News : राणेंच्या कोकणात आदित्य ठाकरे काय नवीन बॉम्ब टाकणार? दोन दिवसांचा दौरा चर्चेत

Aaditya Thackeray in Konkan For Two Days : आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याचं कारण म्हणजे भाजप आणि शिंदे गटाचा आमदारांच्या मतदारसंघांमध्ये होणाऱ्या खळा बैठका...
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे उद्यापासून दोन दिवसांचा कोकणचा झंझावाती दौरा करणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे हे खळा बैठक घेणार आहेत. राणेंच्या कोकणात आदित्य ठाकरे काय नवीन बॉम्ब टाकणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Aaditya Thackeray
Shivsena MLA Disqualification: मोठी अपडेट ! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर होणार मॅरेथॉन सुनावणी

आदित्य ठाकरे 23 आणि 24 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या आणि परवा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठाणे या दरम्यान त्यांचा दौरा असणार आहे. हा दौरा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आगामी निवडणुकांसाठीची तयारी म्हणूनही या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. ( uddhav balasaheb thackeray shiv sena )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरे या दौऱ्यात तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी आदित्य ठाकरे हे उद्यापासून दोन दिवस खळा बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांसोबत बसून नेते, पदाधिकारी आणि नागरिकांशी ते संवाद साधतील.

खळा बैठक म्हणजे कोकणात घरासमोरच्या अंगणाला खळा असे म्हणतात. गाव, वाडीत कुठलाही निर्णय हा अंगणात म्हणजे खळ्यात बसून घेतला जातो. प्रत्येचे मत जाणून घेतले जाते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

असा असेल आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा

आदित्य ठाकरे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये खळा बैठका घेणार आहे. दोडामार्ग ते सावंतवाडी, सावंतवाडी ते कुडाळ, कुडाळ ते बांबार्डे, बांबार्डे ते कणकवली, कणकवली ते राजापूर, राजापूर ते करबुडे असा त्यांचा गुरुवारचा दौऱ्याचा कार्यक्रम आहे. तर शुक्रवारी चिपळूण ते खेड, खेड ते महाड, महाड ते नागोठणे असा दौरा करतील.

आदित्य ठाकरेंचा हा दौरा फक्त राणेंच्या बालेकिल्ल्यातूनच नाही तर शिंदे गटातील मंत्री, आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरेंच्या बैठका होणार आहेत. दीपक केसरकर (दोडामार्ग), नितेश राणे (कणकवली), उदय सामंत (रत्नागिरी), शेखर निकम (चिपळूण), योगेश कदम (खेड) आणि भरत गोगावले (महाड) येथे या बैठका होणार आहेत. यामुळे या बैठकांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aaditya Thackeray
Uddhav Thackeray On BJP : उद्धव ठाकरेंनी दाबली होती भाजप, संघाची दुखरी नस...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com