Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाचे विधिमंडळाला पत्र

ॲड. नार्वेकर हे पक्षपातीपणा करत आहेत. शिंदे गटाला झुकतं माप देत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे केला आहे.
Uddhav Thackeray-Rahul Narwekar-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Rahul Narwekar-Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विधिमंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे. ॲड. नार्वेकर हे पक्षपातीपणा करत आहेत. दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेला असताना प्रतिज्ञापत्रासाठी वाढीव वेळ देऊन अध्यक्ष हे शिंदे गटाला झुकतं माप देत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे केला आहे. (Shiv Sena MLA disqualification case : Thackeray group's letter to the Legislature against Assembly Speaker)

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधान मंडळाला हे पत्र लिहिले आहे. त्यात ॲड. राहुल नार्वेकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत काही सवाल उपस्थित केले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीत शिंदे गटाला वाढीव वेळ देऊन सुनावणी लांबविण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray-Rahul Narwekar-Eknath Shinde
Nagpur Winter Session 2023 : नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय कोणत्या गटाला मिळणार; विधिमंडळासमोर पेच...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांपुढे दोन्ही गटांचे वकील युक्तीवाद करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून अध्यक्षांपुढे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये बुधवारी (ता. २२ नोव्हेंबर) शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

Uddhav Thackeray-Rahul Narwekar-Eknath Shinde
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या रात्रीच्या जेवणाला उजाडते पहाट; उपोषणानंतर अंगात त्राण नाही म्हणून लढ्याला...

सुनील प्रभू यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत सवाल उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या शिंदे गटाला साक्षी, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला वेळ वाढवून दिला आहे. तो का देण्यात आला, असा सवाल ठाकरे गटाकडून विचारण्यात आला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होत आहे. कालच्या सुनावणीत सुनील प्रभू यांनी २१ जून रोजी जो व्हिप बजावला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे किंवा बनावट आहे, असा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा हेाता. तब्बल ४० पेक्षा अधिक प्रश्न प्रभू यांना विचारण्यात आले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुनील प्रभू यांनी दिली आहे.

आजपासून होणाऱ्या सुनावणीत आणखी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. 21 जून रोजीचा व्हिप किती आमदारांना बजावला होता. कोणत्या आमदारांना तो देण्यात आला होता. कशा प्रकारे देण्यात आला होता. शिवाय त्या व्हिपवरच्या नंबरवरहून जेठमलांनी यांनी प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

Uddhav Thackeray-Rahul Narwekar-Eknath Shinde
Kolhapur Farmers Protest : 'ऊसदर जाहीर करा, मगच प्रीतीसंगमवर या'; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा...

दरम्यान, सुनावणीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे काम करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray-Rahul Narwekar-Eknath Shinde
Ahmednagar Politics : विखे पिता-पुत्र निशाण्यावर; जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा अजितदादांच्या आमदाराचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com