

काही माध्यमांतून प्रसारित झालेली “५२ लाख महिला अपात्र” ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
माझी लाडकी बहीण योजनेत सध्या e-KYC प्रक्रिया सुरू असून ती पारदर्शकतेसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
पात्र लाभार्थींना नियमित आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी तपासणी प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Raigad News : महायुतीला राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर विराजमान करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधक तुटून पडत असून टीका करताना दिसत आहेत. तसेच ही योजनाच आता बंद करण्यासाठीच ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा घाट घालण्यात आला आहे. तसेच या योजनेच्या प्राथमिक छाननीतून तब्बल 52 लाख लाभार्थी लाडक्या बहिणांना अपात्र केल्याची माहिती नुकताच समोर आली होती. यावरून आता मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली असून त्यांनी ई-केवायसीबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. तसेच ही योजना तुमचा देवाभाऊ असे पर्यंत बंद होणार नाही असेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे.
सध्या राज्याच्या कानोकोपऱ्याच लाडकी बहीण योजनेची काटेकोरपणे छाननी केली जात आहे. तसेच प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसीही अनिवार्य करण्यात आली आहे. सध्या ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशांना ई-केवायसी करताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ई-केवायसीची मुदत देखील 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर ई-केवायसीनंतर हाच डाटा वापरून आयकर विभागाच्या मदतीने बोगस लाडकींचं पितळ उघड पडण्याची योजना सरकारची आहे.
यामुळे ज्या बहिणींच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न समोर येण्यास मदत मिळणार आहे. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडिच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, त्या अपात्र ठरणार असून त्यांना मिळणारा दरमहा 1500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. प्राथमिक छाननीत हा आकडा 52 लाखांपर्यंत गेला असून त्या अपात्र ठरतील असे बोलले जात होते. ज्यामुळे राज्यभर खळभळ उडाली होती.
यावरूनच आता मंत्री तटकरे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी, काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे म्हटले आहे. तसेच प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-केवायसी ची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. योजने संदर्भात विविध प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर / शासन निर्णयाच्या माध्यमातून / अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी यावेळी केले आहे.
तसेच ई-केवायसीबाबत माहिती देताना, त्या म्हणाल्या की,ई-केवायसी ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती.
FAQs :
नाही, ती पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे.
नाही, e-KYC प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांची खातरजमा करण्यासाठी.
अदिती तटकरे यांनी अधिकृतरित्या स्पष्टीकरण देत या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.
होय, पात्र महिलांना लाभ नियमित मिळावा यासाठी सर्व प्रक्रिया सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.