

राज ठाकरे यांनी कारवाई करून हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर आणि प्रमुख काही नेत्यांनी महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पण केवळ महिन्याभरातच प्रमुख नेत्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे.
या निर्णयामुळे कोकणातील भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Ratnagiri News : राज ठाकरे यांनी कारवाई करत हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये अखेर प्रवेश मिळवला. त्यांच्या रखडलेल्या पक्ष प्रवेशावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. तर या मागे थेट राज ठाकरे यांचा हात होता, असे बोलले जात होते. खेडेकर यांच्या या प्रवेशामुळे खेडमध्ये भाजप भक्कम झाल्याचे बोलले जात असतानाच खेडेकर यांच्यासह भाजपला जोरदार दणका मनसेनं दिला आहे. खेडेकर यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलेल्या जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्षासह तालुका प्रमुखांनी महिन्याभरातच भाजपचा साथ सोडली आहे. या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आगामी स्थानिकसाठी पुन्हा एकदा मनसेनं कंबर कसली असून खेडचा किल्ला पुन्हा मजबूत केल्याचे दिसत आहे.
राज ठाकरेंनी हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी जोरदार टीका करताना आपण, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यासह 350 हून अधिक मनसेचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. ज्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी देखील त्यांचा पक्षप्रवेश होईल असे सांगितले होते. पण त्यांच्या पक्ष प्रवेश एकदा नाही तर दोनदा रखडला. तिसऱ्यांदा ते स्वत: पक्षाकडून कोणतेच निमंत्रण नसताना मुंबईला गेले होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. ज्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला होता.
यावेळी खेडेकर यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष, महिला पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांचे प्रमुख आणि कार्यकर्त्यांचा मोठा समूह राज ठाकरेंना सोडून भाजपबरोबर गेला होता. यामुळे खेडमध्ये असलेल्या मनसेची ताकद संपल्याचे बोलले जात होते. यावरून शिवसेना नेते भरत गोगावले यांनी देखील टोला लगावला होता.
पण आता जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे समोर आले आहे. खेडेकर यांच्याबरोबर भाजपसोबत गेलेले महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा मनसेत दाखल झाले आहेत. गैरसमजामुळे आपल्यासह इतरांनी तो निर्णय घेतला होता. पण आता गैरसमज दूर झाल्याने आपण घरवापसी करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आणि पक्ष प्रवेशानंतर म्हटले आहे.
यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष जुनेद बंदरकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव सुनील साळवी, तालुका अध्यक्ष सचिन शिंदे (रत्नागिरी), संदेश साळवी (चिपळूण), नीलेश भामणे (खेड), रुपेश चव्हाण (रत्नागिरी) यांच्यासह महिला पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मोठा समूह राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत दाखल झाला आहे.
FAQs :
वैभव खेडेकर कोण आहेत?
ते मनसेचे माजी नेते असून अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
2. त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश का केला?
राज ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास यामुळे प्रमुख नेते पुन्हा मनसेकडे वळले.
3. या घटनेचा भाजपवर काय परिणाम होईल?
कोकणातील भाजपची संघटनात्मक ताकद कमी होऊ शकते आणि स्थानिक निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
4. या घटनाक्रमाने कोकणातील राजकीय समीकरणे कशी बदलतील?
मनसेला नवचैतन्य मिळेल तर भाजपला नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.