Mahayuti Politics : CM फडणवीसांनी सर्वच महापालिकांबाबत घेतलेल्या 'त्या' मोठ्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे नाराज?

IAS Officers in D Class Municipalities : वसई-विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन ईडीने केलेली अटक तसंच मिरा-भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांचीही ईडीने चौकशी केल्यामुळे ड वर्ग महापालिकांमधील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
eknath shinde, devendra fadnavis
eknath shinde, devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Sep : मोठ्या महापालिकांप्रमाणे आता ड वर्ग महापालिकांमध्येही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची (IAS) नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान्य नसून महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्ती न करता राज्य शहरी प्रशासन सेवा (मुख्याधिकारी) किवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवावा अशी मागणी शिंदेंच्या नगरविकास खात्याने केली आहे.

तर अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे. अशातच आता 19 ड वर्गाच्या महापालिकांवर देखील लसनदी अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील नाराजीला तोंड फुटले आहे.

वसई-विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन ईडीने केलेली अटक तसंच मिरा-भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांचीही ईडीने चौकशी केल्यामुळे ड वर्ग महापालिकांमधील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी थेट भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

eknath shinde, devendra fadnavis
Laxman Hake : आता तुम्ही ओबीसीत आला पहिले 11 विवाह आपापसात ठरवुया! भरस्टेजवरून लक्ष्मन हाकेंनी जरांगेंना प्रस्ताव देत डिवचलं, म्हणाले, "पाटील, 96 कुळी..."

त्यानुसार साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आणि सुमारे 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या छोट्या महापालिकांमध्येही आता सनदी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच एकनाथ शिंदेंच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

eknath shinde, devendra fadnavis
Nashik News: फिरत्या आरक्षणातही सर्वसाधारण अध्यक्षांचेच वर्चस्व! कुठल्या समाजाला किती वेळा मिळाली संधी? जाणून घ्या

अशातच आता नगर विकास विभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होत असल्याने शिंदे प्रंचड नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या या निर्णयामुळे महायुतीत नव्या वादाला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com