Shirdi BJP Convention : फडणवीसांचा ‘मविआ’वर गंभीर आरोप; ‘निवडणुकांमध्ये अराजकतावादी शक्तींचा वापर’

Devendra Fadnavis Serious Allegations : महाविकास आघाडीने निवडणुकीत अराजकतावादी शक्तींचा वापर केल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील भाजपच्या महाविजय अधिवेशनात केला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Shirdi, 12 January : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील भाजप महाविजय अधिवेशनात अराजकतावादी शक्तींवर तुटून पडताना महाविकास आघाडातील प्रमुख तीन पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या शक्तींना बरोबर घेऊन देशात अन् राज्यात अराजकता पसरविण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप करताना पुढचं युद्ध घुसखोर बांगलादेशी आणि अराजकतावादी शक्तींविरोधात तीव्र करणार असल्याचा एल्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषणाची सुरवात 'भारत माता की जय', या घोषणेनं केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधानविरोधी शक्ती, अराजकतावादी शक्तींचा हालचाली पाहायला मिळाल्या, असे सांगून पुढची लढाई कोणाविरुद्ध तीव्र करणार, याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात संविधानविरोधी शक्ती, अराजकतावादी शक्तींचा हालचाली पाहायला मिळाल्या. विरोधक काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला लक्षात आले की, भाजप अन् मोदींना पराभूत करता येत नाही, म्हणून अराजकतावादी शक्तींना एकत्र येऊन या देशात, राज्यात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात 'व्होट जिहाद', 'फेक नरेटीव्ह' पाहिला. गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय विचार संघटनांनी एकत्रित येऊन, राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केले. अराजकतावादी ताकदींना पराभूत केलं".

'या अराजकतावादी शक्तींना निवडणुकीत पराभूत केलं असलं, तरी त्यांच्या कारवाई थांबलेल्या नाहीत. आपल्या समोर आव्हान आहे. बांगलादेशी घुसखोर सापडत आहे. ते कागदपत्र बनवून मतदार याद्यात घुसलेत. मालेगाव, अमरावतीमधील अंजणगावमध्ये जन्माचे प्रमाणपत्र मिळत आहेत.

Devendra Fadnavis
Amit Shah : "खोटारडेपणा करून मुख्यमंत्री बनलेल्या..." शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

देशात, महाराष्ट्रात एकही घुसखोर राहू देता कामा नये. 'व्होट जिहादचा पार्ट-टू', सुरू आहे. या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान आहे. अराजकतावादी ताकदीविरोधी लढाई घट्ट करावी लागेल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

'या अराजकतावादी ताकदीनं दुसरा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, जाती, पंथामध्ये द्वेष भावना, दुफळी कशी माजेल, यावर या शक्ती काम करत आहेत. गंभीर घटना होत आहे. त्यावर पडसाद उमटणे नैसर्गिक असतं. पण, त्यात देखील अराजकतावादी आपलं मत पुढं नेत आहेत.

Devendra Fadnavis
Walmik Karad : वाल्मिक कराडने 11 कोटीला फसवलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांनी दिला हा सल्ला

असे असले, तरी कुठेतरी महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे. 'एक है तो सेफ है', हा तो मंत्र आहे. या मंत्राने संपूर्ण समाज एक झाला. एक भगवी लहर निर्माण झाला. पुन्हा एकदा दुफळी माजवणाऱ्यांना रोखायचं आहे. त्यामुळे अराजकतावादी ताकदीविरोधातील लढाई संपणार नाही', असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com