Sharad Pawar Politics : अजित पवारांच्या कट्टर आमदाराचा मुलगा शरद पवारांच्या भेटीला? राजकीय वर्तुळात खळबळ

NCP MLA Shekhar Nikam Son : राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. येत्या चार महिन्यात या निवडणुकांची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
Sharad Pawar NCP MLA Shekhar Nikam
Sharad Pawar NCP MLA Shekhar Nikamsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिकबाबत राज्य सरकारला आदेश देताना निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष आता तयारीला लागले आहेत. दरम्यान कोकणात शरद पवार गटाला काही प्रमुख नेते सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदाराचे सुपुत्र शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आगामी स्थानिकसाठी महायुतीतील घटकपक्षांसह महाविकास आघाडीतील मित्र पक्ष तयारीला लागले आहेत. स्थानिकला सत्ता काबिज करण्यासाठी रणनीती आखली जात असतानाच कोकणातील रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मात्र खिंडार पडण्याची शक्यता आहे.

येथे पक्षाचे नेते रमेश कदम शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अशातच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या बाबातीत ही एक बातमी समोर आली आहे. निकम यांचे सुपुत्र अनिरूद्ध यांनी अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत सिलव्हर ओक येथे भेट घेतली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Sharad Pawar NCP MLA Shekhar Nikam
Sharad Pawar Ajit Pawar meeting : शरद पवार-अजितदादा एकत्र येणार; फडणवीस, गडकरी अन् शिंदे साक्षीदार असणार

राज्याच्या राजकारण मध्यंतरी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंद केले. यावेळी येथे थेट निवडणूक शरद पवार विरूद्ध अजित पवार असाच अनेक ठिकाणी लढत पहायला मिळाली. तेंव्हाही निवडणुकीच्या तोंडावर अनिरूद्ध यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

Sharad Pawar NCP MLA Shekhar Nikam
Sharad Pawar reaction : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अनिरूद्ध यांनी ऑस्ट्रेलियातून कृषी विषयातून उच्च पदवी घेतल्यानंतर या क्षेत्रातील जाणकार शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली होती. आताही रविवारी (ता.11) पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष: अनिरूद्ध यांना स्वत: शरद पवार यांनीच बोलावून घेतल्याचे आता समोर येत आहे. दरम्यान पक्ष फुटीनंतर अनिरूद्ध यांनी शरद पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेतल्याने आता चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र रविवारच्या भेटीत दोघांमध्ये कोणती चर्चा झाली? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com