

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणामुळे दोन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
दीपक केसरकर यांच्यावरही आरोप होत असून कोकणातील बनावट बाबांच्या अड्ड्यांवर संताप व्यक्त होत आहे.
Ratnagiri News : सध्या राज्यभर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चर्चेचा विषय बनला बनला असून आता या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींची नावे देखील समोर येत आहेत. याच कारणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता तळकोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचाही संबंध या भोंदूबाबा अशोक खरातशी असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच आता कोकणात अनेक तथाकथित बाबांचे अड्डे चर्चेत आले आहेत. यामुळे कोकणात खळबळ उडाली असून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या तथाकथित बाबांच्या कारवायांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित अनेक राजकीय व्यक्तींची नावे समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत दीपक केसरकर यांच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षांना लक्ष केले. त्यांनी, स्वत: केसरकर म्हणत असून 40 आमदार तिथे जात होते. मग मीच का? असा सवाल केल्याचे म्हटले आहे.
तसेच मला टार्गेट करू नका असे म्हणत तिथे 40 आमदार, खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, असे म्हटले आहे. मग हे 40 आमदार कोण?, तिथे जाणारे मंत्री कोण? याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे. ती नावे जाहीर केली पाहिजेत, असे म्हणच टीका केली आहे. या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापले आहे. अशावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांच्या दापोली तालुक्यातही 'भोंदूगिरी'च्या प्रकरणांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तर राज्यात गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या तथाकथित बाबांच्या कारवायांविरोधात बोलले जात आहे.
दापोली तालुक्यातील काही गावांमध्ये अशा पद्धतीने बाबांचा 'दरबार' भरत असून याची संख्या वाढत असल्याची कुजबूज आहे. अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या गोष्टी करत सर्वसामान्यांना गंडवले जात आहे. तर याच माध्यमातून काही जण स्वतःभोवती अनुयायांचा गोतावळा भरवत असून आपल्या भोंदूगिरीचे जाळे अधिक मजबूत करत आहेत.
दरम्यान आता अशा बाबांच्या भोवती 'आंबट' मंडळी जमा होताना दिसत आहेत. तर यांच्याकडून भोंदूगिरीला खतपाणी घातले जात आहे. तर अशा अंध अनुयायांमुळेच तथाकथित बाबांचे धाडस वाढत असल्याची टीका आता सर्व सामान्यांतून होताना दिसत आहे.
खरातसारखे गंभीर प्रकरण तालुक्यात उघडकीस आले नसले तरी अशा प्रवृत्तींकडे पोलिस व संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी तालुक्यात होताना दिसत आहे. तर संशयास्पद अड्यांवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशीही आग्रही मागणी केली जात आहे. पण आता या मागणीकडे प्रशासन कसे बघते, किती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण काय आहे?
हे एक वादग्रस्त प्रकरण असून त्यामध्ये तथाकथित बाबांच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा का दिला?
या प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे त्यांनी महिला आयोग आणि पक्षपदाचा राजीनामा दिला.
3. दीपक केसरकर यांच्यावर काय आरोप आहेत?
त्यांचा या भोंदूबाबाशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.
4. कोकणात काय घडत आहे?
कोकणातील अनेक ठिकाणी बनावट बाबांच्या अड्ड्यांवर चर्चा सुरू असून संताप वाढत आहे.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय दबाव वाढू शकतो आणि संबंधितांवर चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.