

अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर आरोप होत असून राजकीय वाद वाढला आहे.
संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
उदय सामंत यांनी केसरकरांचा बचाव करत आरोप फेटाळून लावले आहेत.
Kokan/Pune News : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत असून त्याविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. दरम्यान खरातशी संबंध असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर होत आहे. यावरून विरोधकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि महिला नेत्या सुषमा अंधारे सरकारवर तुटून पडल्या असून केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.
यादरम्यान केसरकर यांच्या बचावासाठी उदय सामंत सर्सावले असून त्यांनी विरोधकांसह राऊत आणि सुषमा अंधारे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जर या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. तर एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो येणं म्हणजे तो त्या गुन्ह्यांमध्ये आहे असं होत नाही असेही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अशोक खरात प्रकरणात SIT तपास करत असून या तपासात धक्कादायक माहिती उघड होत आहे. खरात हा काळा पैसा व्हाईट करत दावा देखील आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच केसरकर आणि अशोक खरात यांच्यातील बैठकीचे काही फोटो समोर आले आहेत. यामुळे या प्रकरणात नवा ट्वीस्ट पाहायला मिळत असून राज्यात खळबळ उडाली आहे.
यावरून केसरकर अडचणीत येतील अशी श्क्यता वर्तवली जात असतानाच, आपण खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर दोषी ठरलो असतो. पण फक्त ओळख असल्यामुळे त्याच्या वाईट कृत्याशी आपला संबंध जोडणे चुकीचं आहे. हा सगळा प्रयत्न उबाठाकडून केला जात असून त्यांच्या नेत्याने मंदिराला पाणी दिलं.
मंदिराला निधी दिला आज तेच आरोप करत आहेत. त्यांनी केलं तर योग्य आणि दुसरं कोणी मंदिरात गेलं तर चुकीचं हे बरोबर नाही. तर हे सगळं राजकीय द्वेषापोटी चाललयं असाही दावा केसरकर यांनी केला आहे. तर सार्वजनिक जीवनात चांगली असलेली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यावरून आपण कारवाई करू असाही इशारा त्यांनी दिला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खरात सारख्या विकृत माणसाच्या मागं कोण जरी असेल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. हीच भूमिका सरकारची असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देखील मांडलेली आहे. खरात हा आमच्या दृष्टीने अतिशय विकृत प्रवृत्तीचा असलेला माणूस असून त्याला मदत करणारी व्यक्ती कोणीही असो त्याच्यावर कारवाई होईल.
तसेच केसरकर यांच्यावर होणाऱ्या आरोपावर बोलताना सामंत म्हणाले, केसरकरांनी खरात प्रकरणात आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो निघणं म्हणजे तो त्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे असं होत नाही. केसरकर हे नक्कीच भावनिक आहेत. त्यांची देवाप्रती मोठी श्रद्धा आहे. तशी सगळ्यांचीच असते. पण केसरकरांची आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे.
यामुळे त्यांना टार्गेट करणे योग्य नाही. केसरकरांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता त्यांचा फोटो किंवा त्यांचे तिथे जाणं समोर येत असल्यावरून टार्गेट केलं जात असेल तर ते योग्य नाही. आता फक्त त्यांचेच फोटो समोर येत आहेत का? अनेकांचे फोटो खरातबरोबर आहेत. मिलिंद नार्वेकरांचाही फोटो खरात सोबत आहे. त्यामुळे ज्यांची ज्यांची चौकशी करायची ते शासन नक्की करेल. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही बाईट देत असताना आमच्या बाजूला जर एखादा कोणीतरी उभा असेल आणि त्याचा फोटो निघाला. जर तो दोषी असेल तर आम्ही दोषी आहोतन असे होत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
1. दीपक केसरकर यांच्यावर काय आरोप आहेत?
त्यांचा अशोक खरात प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.
2. विरोधकांची भूमिका काय आहे?
विरोधकांनी केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
3. उदय सामंत यांनी काय सांगितले?
त्यांनी आरोप फेटाळून लावत दोषी असल्यास कारवाई होईल असे म्हटले.
4. फोटोवरून आरोप का होत आहेत?
फोटोमध्ये दिसल्यामुळे संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय तणाव वाढून पुढील चौकशी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.