Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं ‘कल्याण’ कधी होणार? जागावाटपावरून सामूहिक राजीनामे

Mahavikas Aghadi Congress Candidates : महाविकास आघाडीत काँग्रेसला एक ही जागा न मिळाल्याने पदाधिकारी नाराज झाले आहेत.  
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : महाविकास आघाडीत जागावाटपावरून अजूनही धुसफूस सुरू आहे. प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसला कोकण विभागात एकही जागा मिळणार नाही. त्यामुळे काही मतदारसंघातील पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले असून सामूहिक राजीनामे दिले आहेत.  

कल्याण लोकसभा मतदारसंघातील  कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडे स्थानिक उमेदवार नाही. बाहेरून उमेदवार आयात करण्यात आला. कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस - राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल, अशी आशा येथील पदाधिकाऱ्यांना होती. काँग्रेसमध्ये सक्षम उमेदवार असूनही पक्षाला ही जागा मिळाली नाही. त्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Congress
Aurangabad West Assembly: लोकसभेत `जरांगे फॅक्टर` चालला, विधानसभेसाठी उमेदवारांची अंतरवालीकडे धाव

कल्याण पूर्व मध्ये भाजप व शिंदे गटात वाद असून आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत. त्यासोबतच भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे ये खासदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे सचिन पोटे, नवीन सिंग व राष्ट्रवादीचे सुधीर पाटील यांच्यासह काही जण इच्छुक होते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चारही जागा या ठाकरेंना मिळाल्या आहेत.

आता जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजीचा सूर आळवला आहे.

Congress
Nilanga Assembly Constituency 2024 : काँग्रेसचे निलंगेकर बंडाचा झेंडा हाती घेणार ? पत्नीने घेतली जरांगे पाटलांची भेट

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी रविवारी राजीनाम्याचे अस्त्र उगारले. कल्याण येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत माहिती दिली. कल्याण डोंबिवली मधील 4 विधानसभेपैकी एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही. सक्षम उमेदवार असूनही नेत्यांनी त्यासाठी जोर लावला नाही. कल्याण पूर्वेत ठाकरे गटाने उमेदवार आयात केला आहे, असे पोटे यांनी सांगितले.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मागीलवेळीही बोडारे यांचा पराभव केला आहे. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचा या जागेसाठी विचार व्हायला हवा होता. या निर्णयावर स्थानिक पदाधिकारी नाराज असून आम्ही पक्षातील पदांचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पोटे यांनी सांगितले. दोन दिवसांत याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com