Aurangabad West Assembly: लोकसभेत `जरांगे फॅक्टर` चालला, विधानसभेसाठी उमेदवारांची अंतरवालीकडे धाव

Manoj Jarange News: आता या भेटीत जरांगे पाटील यांनी तिघांपैकी कोणाला पाठिंब्याचा शब्द दिला का? की त्यांना आल्या पावली परत पाठवले? हे 23 नोव्हेंबरच्या निकालनंतरच स्पष्ट होईल.
Aurangabad West Assembly Constituency
Aurangabad West Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

योगेश पायघन

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुक जाहीर झाली, तशी महायुती-महाविकास आघाडीच्या विद्यमान आणि भावी आमदारांची पाऊले मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदु असलेल्या अंतरवाली सराटीकडे वळायला सुरवात झाली. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका सत्ताधारी महायुतीला असा काही बसला की मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ वगळता सातही ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले.

संदीपान भुमरे विजयी झाले तरी शहरातील पुर्व, मध्य मतदारसंघात ते पिछाडीवर होते. एकट्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भुमरे यांना मताधिक्य मिळाले होते. हे लक्षात घेऊन पश्चिमचे विद्यमान आमदार संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे आणि रमेश गायकवाड यांनी अंतरवालीकडे धाव घेत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आता या भेटीत जरांगे पाटील यांनी तिघांपैकी कोणाला पाठिंब्याचा शब्द दिला का? की त्यांना आल्या पावली परत पाठवले? हे 23 नोव्हेंबरच्या निकालनंतरच स्पष्ट होईल.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठवडाभरापासून अंतरवाली सराटीत विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे ही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. परतु अजूनही ते कोणत्या मतदारसंघात थेट उमदेवार देणार, कुठे कोणाला पाठिंबा देणार? कोणाकडून लेखी हमी घेणार? हे स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 आॅक्टोबर आहे. त्यामुळे उद्या जरांगे पाटील या संदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे.

Aurangabad West Assembly Constituency
MLA Sanjay Shirsat News : संजय शिरसाट म्हणतात, मनोज जरांगेंच्या भुमिकेनंतरच निवडणुकीत खरी रंगत..

या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. अर्थात चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजु शिंदे यांनी तीन दिवसाआधीच जरांगे (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केले.

तर महाविकास आघाडी, वंचित, एमआयएमकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रमेश गायकवाड यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत जरांगे पाटील यांना पाठिंब्यासाठी साकडे घातल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या पश्‍चिम मतदार संघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना एकूण 95 हजाराहून अधिक मते मिळाली होती. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांना 58 हजार मते मिळाली होती.

तर एमआयएम या मतदार संघात तिसऱ्या स्थानावर होती. महाविकास आघाडी विरोधात 37 हजार 207 मतांची लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्याने विधानसभेच्या उमेदवारांनी अंतरवाली सराटीकडे धाव घेतल्याचे दिसून येत आहे.

Aurangabad West Assembly Constituency
Manoj Jarange Patil : सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणाऱ्या जरांगेंनी निवडणूक लढवावी का? सर्वेक्षणात 'ही' मोठी माहिती समोर

पश्‍चिममध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी टक्कर होत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गेल्यावेळी उमेदवारी अर्ज बाद झालेले रमेश गायकवाड हे तिसरे उमेदवार असण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे पाटील यांचा या तिघांपैकी पाठिंब्याचा आशिर्वाद कोणाला मिळतो का? की मग जरांगे पाटील थेट या मतदारसंघात आपला उमेदवार देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com