Palghar Politics: पालघरमध्ये लोकसभेला हितेंद्र ठाकूर भाकरी फिरवणार? तीन विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष

Mumbai News: बहुजन विकास आघाडीने भाजप (BJP) आणि शिवसेनेला चांगलीच लढत दिली होती.
Hitendra Thakur
Hitendra ThakurSarkarnama
Published on
Updated on

संदिप पंडीत :

विरार : पालघर लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन वसई विरार मधील आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी'ने आता पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित केल आहे. बहुजन विकास आघाडीने "मिशन पालघर" संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भाजप (BJP) आणि शिवसेनेला चांगलीच लढत दिली होती. तर पालघर लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यावर झालेल्या पहिल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे निवडून आले होते. यावेळी मात्र राजकीय पुलाखालून बरेच पाणी गेले असल्याने बविआने पक्ष विस्ताराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आता पर्यंत बरोबर असलेल्या काँग्रेसनेही या मतदार संघात एकला चलोचा नारा दिल्याने पक्ष खडबडून जागा झाला आहे.

Hitendra Thakur
Maval BJP And Shivsena : खासदार बारणेंची डोकेदुखी वाढणार; भाजप थेट मावळमधील ताकदीवरच बोलले

पालघर लोकसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतदार संघ स्थापन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने विजय संपादन केला होता, तथा बविआचे बळीराम जाधव या लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसह झालेल्या एकूण तीन लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव पराभूत झाले होते.

बविआचं नेतृत्व आता पालघर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची भाकरी फिरविणार असल्याचीही पक्षांतर्गत चर्चा आहे. त्याचसोबत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षसंघटन अधिक प्रभावी करण्याकडे पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.पालघर लोकसभा मतदार संघात वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा मतदार संघात बविआची (Bahujan Vikas Aghadi) चांगली राजकीय ताकद आहे. (Maharashtra Politics)

Hitendra Thakur
Vikhe Patil Vs Pawar : आधी घरातल्या वाटण्या एकत्र बसून करा; सुजय विखेंचा पवारांवर निशाणा

मात्र पालघर, डहाणू व विक्रमगड या तीन विधानसभा मतदार संघात बविआ मोठ्या प्रमाणात बॅकफुटवर आहे. या तीन विधानसभा मतदार संघांतील पिछाडी बविआसाठी राजकीयदृष्ट्या नेहमी मारक ठरत आलेली आहे. आता बविआने पालघर ग्रामीण जिल्ह्यात ’गाव तेथे पक्षाची शाखा’ अशी भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने बविआने वाडा तालुक्यातील डोंगस्ते (भिवंडी लोकसभा मतदार संघ) गावात नव्या शाखा कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. (Palghar Politics)

पालघर ग्रामीण जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गट पालघर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असून अन्य दोन जिल्हा परिषद गटांसह वाडा शहर क्षेत्र भिवंडी लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. वाडा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांसह वाडा शहरात ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा सुरू करण्याचा बविआचा मनोदय आहे. त्याचप्रमाणे विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा, पालघर व जव्हार या तालुक्यांकडेही बविआने लक्ष वेधलं आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बविआची मंडळी केवळ निवडणुकीच्या वेळेस या भागात फिरकते असा आरोप पक्षाच्या नेत्यावर करण्यात येत होता. त्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून वसईतील काही प्रमुख नेत्यावर ग्रामीण भागाचा भार सोपवल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com