Maval BJP And Shivsena : खासदार बारणेंची डोकेदुखी वाढणार; भाजप थेट मावळमधील ताकदीवरच बोलले

Maval Loksabha Contituency : शिरूरनंतर मावळवरही भाजपने ठोकला दावा
Shrirang Barane
Shrirang BaraneSarkarnama
Published on
Updated on

Cold War Between Shivsena And BJP On Maval : मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनी २०२४ ला पुन्हा आपणच युतीचे उमेदवार असल्याची जाहीर घोषणा नुकतीच केली. त्यानंतर युतीतील भाजपनेही या जागेवर आज दावा केल्याने बारणेंची चिंता वाढली आहे. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघात त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. मावळमधील सुरू असलेल्या या राजकीय शीतयुद्धामुळे वरिष्ठनेत्यांची मात्र चिंता वाढणार असल्याचे दिसून येते. (Latest Political Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या @ मोदी9 ही मोहीम देशभर राबविली जात आहे. त्यात मोदी सरकारची कामे घराघरात पोचवण्यासह विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील जाहीर सभा आळंदी (ता. खेड), वडगाव (ता.मावळ) येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २४) कार्यक्रम पार पडले. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा अध्य़क्ष गणेश भेगडे यांनी दानवे यांच्याकडे मावळ लोकसभेबाबत चर्चा केली. मतदारसंघात शिवसेनेपेक्षा अधिक भाजपची ताकद आहे. त्यामुळे मावळ भाजपकडे घेण्याची मागणी त्यांनी केली.

Shrirang Barane
BJP And Shivsena Meeting : भाजप-शिंदे गटातील स्थानिक वादावर 'हा' तोडगा; समन्वय समितीची आज बैठक

यावर दानवे यांनी हा विषय माझ्या अखत्यारीतील विषय नसून पक्षाच्या राज्य कोअर कमिटीचा असल्याचे सांगितले. त्यानंतरही भेगडे आपल्या मागणीवर ठाम असल्याचे समजते. दरम्यान, कोअर कमिटीच नाही, तर पक्षाच्या सबंधित वरिष्ठांकडे आता ही मागणी लेखी स्वरुपात आणि पक्षाच्या ताकदीच्या पुराव्यासह करणार असल्याचे भेगडे यांनी `सरकारनामा`ला सांगितले आहे. मावळमध्ये सहापैकी भाजपचे तीन, तर शिवसेनेचा फक्त एक आमदार आहे. जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती सदस्य, सरपंचही शिवसेनेपेक्षा अधिक आहेत. या बलाकडे भेगडे यांनी यावेळी लक्ष वेधले. दरम्यान, माजी राज्यमंत्री आणि भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी मावळमधून लढण्याची तयारी असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.

Shrirang Barane
Maan News : शरद पवारांनी चाखली माणदेशी केशर आंब्याची चव...!

दरम्यान, लोकसभा लढता यावी म्हणूनच बारणेंनी गेल्यावर्षी शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गदात सामील होण्याची खेळी केलेली आहे. पुणे जिल्हा भाजप अध्यक्षांच्या दाव्यावर खासदर बारणे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करणे व उमेदवारी मागण्याचा हक्का असतो. मात्र,त्याचवेळी भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा एकदा नाही, तर दोनदा केली आहे. एवढेच नाही, तर केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनीही आपली उमेदवारी कबूल आणि मान्यही केले आहे."

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे शहराचा ६६ टक्के भाग हा मावळमध्ये मोडतो. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ३४ टक्के हा शिरूरमध्ये येतो. युतीच्या जागावाटपात हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. मावळमध्ये बारणे हे विद्यमान खासदार असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. तर, शिरूरला सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. त्यापूर्वी तेथे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तीनदा खासदार होते.

Shrirang Barane
Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात तरुणीवर प्राणघातक हल्ला

पक्षाचे खासदार नसलेल्या ठिकाणी भाजपने २०२४ साठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात शिरूर आणि मावळही आहे. त्यातूनच गतवेळी २०१९ ला लोकसभेसाठी शिरूरमधून चर्चेत असलेले पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव २०२४ ला घेतले जात आहे. पक्षाकडे ही जागा आली आणि उमेदवारी मिळाली, तर शिरूर लढू,असे पैलवान आमदार लांडगेंनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे पराभूत होताच २०१९ पासूनच पुन्हा कामाला लागलेले व उमेदवारीसाठी शिवसेनेकडून तीव्र इच्छूक असलेले आढळराव यांचे टेन्शन वाढले आहे.

मावळमध्ये गतवेळी २०१९ ला पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. आता पवार कुटुंबाला शह देण्यासाठी बारामतीबरोबरच शिरूरवरही लक्ष भाजपने केंद्रीत केले आहे. त्यातून आमदार लांडगेंसारखा तगडा उमेदवार शिरूरला देण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com