Vikhe Patil Vs Pawar : आधी घरातल्या वाटण्या एकत्र बसून करा; सुजय विखेंचा पवारांवर निशाणा

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरण्याची शक्यता
Sharad Pawar, Sujay Vikhe Patil
Sharad Pawar, Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Sujay Vikhe Attack on NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता २५ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. यानिमित्त मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आणि देशभरातील पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षातील सर्व वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची भाषणे झाली. त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि भविष्यातील रणनीती यावर आपापली मते व्यक्त केली. आता जास्तीत आमदार निवडून आणण्यासाठी काय योजना आखावी लागेल, याबाबही चर्चा झाली. (Latest Marathi News)

पक्षाच्या याच कार्यक्रमात फायर ब्रँड म्हणून ओळखले जाणारे विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार यांनी विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेता व्हायचे नसल्याचाही गौप्यस्फोट केला. मात्र वरिष्ठांच्या आग्रहाने आपण हे पद स्वीकारल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

पवार म्हणाले, "मला विरोधी पक्षनेते पद नकोय. आता मला पक्ष संघटनेचे काम करण्याची इच्छा आहे. पक्षातील वरिष्ठ देतील ती जबाबदारी घेऊ आणि त्या पदाला शंभर टक्के न्याय देईल." यानंतर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची इच्छा असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे.

Sharad Pawar, Sujay Vikhe Patil
Jalgaon Politics: खडसे आणि गुलाबराव पाटलांमध्ये समझोता; अब्रू नुकसानीचा दावा मागे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील झालेल्या आणि संभाव्य संघटनात्मक बदलांबाबत भाजप खासदार सुजय विखे यांनी खोचक टीका केली आहे. यावेळी त्यांनी पक्षातील नेतृत्वासाठी सुरू असलेल्या स्पर्धेबाबत सूचक वक्तव्य केले. यातून त्यांनी पवार कुटुंबांवरही 'परिवार वादा'ची टीका केली.आधी घरातील वाद मिटवा, असे सुजय विखे यावेळी म्हणाले आहेत. यामुळे विखे-पवार यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar, Sujay Vikhe Patil
Jalgaon Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री पोहचण्यापूर्वीच जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड; काय आहे कारण ?

पक्ष संघटनेत सुरू असलेल्या चर्चाबद्दल खासदार विखे म्हणाले, "हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र पक्षाचे मेळावे आणि दौरे करण्यापेक्षा सुरुवातीला घरात बसून पक्षाच्या संघटनात्मक पदांबाबत ठरवलं पाहिजे. महाराष्ट्रभर दौरे करण्यापेक्षा पक्षाचा मुख्यमंत्री कोण होणार? नवा अध्यक्ष कोण होणार? नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार? त्याच बरोबर कोण-कुठे जाणार किंवा कोण कोणाबरोबर जाणार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे अगोदर त्यांनी (पवार कुटुंबाने) घरातल्या वाटण्या करून घ्याव्यात. त्यानंतरच महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करावे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com