Loksabha Election 2024 : पहाडासारख्या भास्कर जाधवांची इमोशनल पोस्ट; रविवारी काहीतरी घडणार...

Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणजे थेट लक्ष्यावर निशाणा साधणारे. पण काही दिवसांपासून ते अस्वस्थ आहेत. नीलेश राणे आणि रामदास कदम-सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्या टीकेला भास्कर जाधव उत्तर देण्यापूर्वीच त्यांची एक भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Bhaskar Jadhav, Nilesh Rane sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकमेकांवरील टीकेला कोकणी धार आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी गुहागरमध्ये सभा घेत भास्कर जाधव यांच्यावर अत्यंत आक्रमक टीका केली होती. त्यानंतर आठवड्यापूर्वी शिवसेनेचे रामदास कदम यांनीही भास्कर जाधव यांच्यावर टीकेचा आसूड ओढला होता. त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा गुहागरमध्ये सुनील तटकरे आणि रामदास कदम यांची एकत्र सभा भास्कर जाधव यांच्याच मतदारसंघात म्हणजे गुहागरमध्ये होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांची एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे.

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
MLA Yogesh Kadam:...तर मलाही नाईलाजाने पावलं उचलावी लागतील; आमदार कदमांनी भाजपला सुनावलं

तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर 'या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे...' ही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची भावनिक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. भास्कर जाधव यांची उद्या (10 मार्च) चिपळूणमध्ये सभा आहे. या सभेत ते त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करणार आहेत. चिपळूणमधील बांदल हायस्कूलच्या मैदानात सकाळी 11 वाजता भेटूया, आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊ या, असे भास्कर जाधव यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून रानावनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखरं पार करू शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्षे सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय, असेही त्यांनी नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होत आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे, याचाही उल्लेख भास्कर जाधव यांनी केला आहे. जुन्या सहकाऱ्यांमुळे आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, यासाठी ऊर्जा मिळत आहे.

दरम्यान, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे, असा दावा करत या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे, त्यासाठी रविवारी भेटू या, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले आहे.

या इमोशनल पोस्टमुळे भास्कर जाधव यांना नक्की काय बोलायचं आहे, ते एखादी राजकीय भूमिका जाहीर करणार का? त्याचवेळी नीलेश राणे (Nilesh Rane), सुनील तटकरे (Sunil Tatkare) तसेच रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या जहरी टीकेला काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Shivsena Politics : रामदास कदम यांना 'दुसरी' लॉटरी; दुसऱ्या मुलाची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com