Shivsena Politics : रामदास कदम यांना 'दुसरी' लॉटरी; दुसऱ्या मुलाची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती

Siddhesh Ramdas Kadam : शिवसेना नेते रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.
Siddesh Ramdas Kadam
Siddesh Ramdas KadamSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News :

शिवसेना नेते रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास कदम यांचे मोठे पुत्र योगेश कदम रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आमदार आबासाहेब जऱ्हाड दीर्घकाळ गैरहजर असल्याचे कारण देत त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सिद्धेश रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Siddesh Ramdas Kadam
Ramdas Kadam: माझेही नाव रामदास कदम आहे...; भाजपला सज्जड दम; निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी

शिवसेनेत असताना सिद्धेश कदम (Siddhesh Ramdas Kadam) युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना फुटल्यानंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे आता सिद्धेश कदम यांच्यावर शिवसेनेच्या सचिवपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामदास कदम शिवसेनेशी म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्याचं फळ म्हणून त्यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम यांच्यावर एवढ्या मोठ्या मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याचे बोलले जाते. कालच रामदास कदम यांनी भाजपला सज्जड दम भरला होता.

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रात भाजपसोबत आलो आहोत. महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नये, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, लक्षात ठेवा मीही 25 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो आहे, असा दम रामदास कदम यांनी भरल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Siddesh Ramdas Kadam
Sharad Pawar : "मला 'शरद पवार' म्हणतात, माझ्या वाटेला गेला, तर...", पवारांचा शेळकेंना थेट इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com