मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या कदम पिता पुत्रांवरची भास्कर जाधवांनी हवाच काढली; बापाला येडा म्हणाले, मुलाच्याविरोधात उमेदवारच जाहीर केला

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : नुकसाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रत्नागिरीतील मंत्र्यांनी भास्कर जाधवांना टाग्रेट करण्याचे जाहीर केले होते. तर माजी मंत्री जेष्ठ नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला होता.
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाने शिवसेना (उद्धव गट) विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकारण तापले आहे.

  2. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर ‘बामदास छमछम’ व ‘ठार येडा’ असे म्हणत टोकाची टीका केली.

  3. योगेश कदम यांनी ‘भगवा फडकवू’ म्हणत केलेल्या विधानानंतर भास्कर जाधव यांनी थेट उमेदवारच जाहीर केला.

Ratnagiri News : सध्या तळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत सत्ता आपल्या हातात घेण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष वाढीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लक्ष करताना दिसत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुन्हा एकदा आपले लक्ष शिवसेनेला करताना आता चिपळूण आणि गुहागरमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे म्हटले होते. तर शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी माझ्या सभा लागल्या नाहीत. अन्यथा भास्कर 20 हजारांनी उलटा झाला असता अशी टीका केली होती. त्यावर आता भास्कर जाधव यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी, रामदार कदम हे बामदास असून ते बामदास छमछम आहेत. तो ठार येडा असल्याची टीका केली आहे. तर ज्या योगेश कदम यांनी मतदारसंघात पेरणी करून भगवा फडकवू अशी घोषणा केली त्यांच्याविरुद्ध थेट उमेदवारच जाहीर केला. ते गुहागर येथील कार्यक्रमात बोलत होते. यामुळे सध्या जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. (Ratnagiri Politics on Fire: Bhaskar Jadhav Calls Ramdas Kadam ‘Bamdas Chhamchham’, Declares Candidate Against Yogesh Kadam)

राज्यात सध्या आगामी स्थानिकच्या अनुशंगाने मोर्चे बांधणीला राजकीय पक्ष लागले आहेत. त्यासाठी बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. दरम्यान कोकणात फोडाफोडीचे राजकारण पुन्हा सुरू झाले आहे. नुकताच उदय सामंत, योगेश कदम आणि माजी मंत्री रामदार कदम यांनी आपले पुढचे टार्गेट हे गुहागर आणि चिपळूण असेल असे जाहीर केले होते. तर गुहागर तेथे शिवसेनेचा झेंडा फडकवू असा दावा केला होता. रामदास कदम यांनी, विधानसभेला आपल्या सभा जाधव यांच्या मतदारसंघात लागल्या नाहीत. अन्यथा जाधव 20 हजारांनी झोपला असता अशी टीका केली होती.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Bhaskar Jadhav : 'लवकरच, मी मंत्री होणार!', भास्कर जाधवांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!

त्याला आता आमदार भास्कर जाधव यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधताना, कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागलं आहे. ते रामदास नव्हे तर बामदास कदम आहेत. तो ठार येडा झालाय असे म्हणत टीका केली आहे. तसेच यावेळी भास्कर जाधव यांनी सावली डान्सबारचा विषय काढत रामदास कदम याच्यावर टीकेची झोड उडवली.

भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदम यांना लाज वाटली पाहिजे. सावली बार काही आज सुरू नाही. गेल्या 30 वर्षापासून तेथे छमछम वाजत आहे. रामदास कदम यांच्या मी कधी पाया पडलो नाही. पण रामदास कदम विधान भवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया अनेकदा पडलेत. भास्कर जाधव एकवेळ मरेल पण तुमच्या पाया पडणार नाही.

भास्कर जाधवांनी थेट उमेदवारच जाहीर केला

सध्या तळ कोकणात शिवसेना विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला असून आता नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. योगेश कदम यांनी दिलेल्या आव्हानाला भास्कर जाधव यांनी प्रतिआव्हान दिले आहे. भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांच्या विरोधात भर सभेतच उमेदवारच जाहीर केला. जेवढा निधी आमदार म्हणून दापोली विधानसभा मतदार संघात जातो, त्यापेक्षा जास्त निधी यापुढे गुहागर मतदार खेचून आणू असाही दावा भास्कर जाधव यांनी केला.

दरम्यान आता भर सभेतच भास्कर जाधव यांनी कुणबी कार्डच काढले. त्यांनी सहदेव बेटकरांना थेट योगेश कदमांच्या विरोधात दंड थोपटण्याचे निर्देश दिले. तसेच आमदार व्हायचंच आहे. आता दापोली मतदार संघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा असाही सल्ला त्यांनी दिला आहे. बेटकर हे 2019 मध्ये भास्कर जाधवांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. जे आता शिवसेनेत संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Bhaskar Jadhav News: भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद का दिलं गेलं नाही? उद्धव ठाकरेंचा बडा नेता सगळंच खरं बोलून गेला

FAQs :

प्र.1: रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण का तापलं आहे?
उ: भाजप व शिंदे गटाने शिवसेना (उद्धव गट) विरोधात आक्रमक मोहीम चालवली असून त्यावर भास्कर जाधवांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्र.2: भास्कर जाधव यांनी कोणावर आणि काय टीका केली?
उ: माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर 'बामदास छमछम' आणि 'ठार येडा' अशी टीका केली आहे.

प्र.3: योगेश कदम यांच्याविरोधात काय पाऊल उचललं गेलं?
उ: भास्कर जाधव यांच्या गटाने योगेश कदम यांच्याविरोधात थेट उमेदवार जाहीर करून निवडणुकीतील संघर्ष अधिकच उग्र केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com