
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी 'मी लवकरच मंत्री होणार' असे धाडसी वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.
मंत्री न झाल्यास हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईन, अशीही त्यांनी जोरदार घोषणा केली आहे.
या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथीच्या चर्चा पुन्हा एकदा गडद झाल्या आहेत.
Ratnegiri News : राज्याच्या राजकारण सध्या अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकसात दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट घेतली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा ते दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांची सहकुटूंब भेट घेतली. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. अशातच राज्यातील महायुतीचे सरकार पडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी देखील, लवकरच मी मंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भास्कर जाधव ठाकरेंना सोडणार की राज्यातील सरकारच पडणार असे प्रश्न अनेकांच्या पडतान दिसत आहे.
राज्यात सध्या आगामी स्थानिकच्या तोंडावर महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. त्यासाठी बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. दरम्यान महत्वाचे नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी पक्ष प्रवेश देखील केले जात आहेत. कोकणात देखील सध्या ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात महायुतीत प्रवेश होताना दिसत आहेत. येथे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत शिवसेना फोडताना दिसत आहेत.
नुकसात उदय सामंत, योगेश कदम आणि माजी मंत्री रामदार कदम यांनी आपले पुढचे टार्गेट हे गुहागर असेल असे संकेत दिले असून तेथे शिवसेनेचा झेंडा फडकवू असा दावा केला आहे. तर येथे भास्कर जाधव यांचे जवळचे पदाधिकारी फोडले जात आहेत. अशातच भास्कर जाधव यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वत्र चर्चा होत असून त्यांनी, लवकरच राज्यात आपलं सरकार येणार असून मी मंत्री होणार असा दावा केला आहे. तसेच त्यांनी, मी मंत्री झालो नाही, तर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नक्की होईन, असेही म्हटले आहे. त्यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहेत. येथे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असून गळती थांबवण्याच्या उद्देशाने भास्कर जाधव यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांनी अर्धवट वकील म्हणणाऱ्या रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना, रामदास कदम म्हणजे 'बामदास छमछम' असे असल्याचे ते म्हणाले. रामदास कदम यांनी, विधानसभेला आपल्या सभा जाधव यांच्या मतदारसंघात लागल्या नाहीत. अन्यथा जाधव 20 हजारांनी झोपला असता अशी टीका केली होती.
प्र. 1: भास्कर जाधवांनी काय वक्तव्य केले आहे?
उ: भास्कर जाधव यांनी लवकरच मंत्री होणार असल्याचा दावा केला असून, मंत्री न झाल्यास ते विरोधी पक्षनेता होतील असेही म्हटले आहे.
प्र. 2: या वक्तव्यानंतर काय परिणाम होऊ शकतो?
उ: या वक्तव्यानंतर ठाकरे गटामध्ये नेतृत्वावर चर्चा वाढण्याची शक्यता असून राज्याच्या सत्तासमीकरणावरही परिणाम होऊ शकतो.
प्र. 3: हे वक्तव्य कुठल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आले आहे?
उ: हे वक्तव्य येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे, जिथे अनेक राजकीय बदल घडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.