Bhaskar Jadhav : नारायण राणेंना भोवळ! ठाकरेंचा आमदार भावूक, राजकीय मतभेद विसरून दिली भावनिक प्रतिक्रिया

Bhaskar Jadhav On Narayan Rane : चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ आल्यानंतर एकच पळापळ आणि राज्यभर खळबळ उडाली होती.
Bhaskar Jadhav And Narayan Rane
Bhaskar Jadhav And Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंची तब्येत अचानक बिघडली होती.

  2. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी राजकीय मतभेद असूनही जिव्हाळा कायम असल्याचे सांगितले.

  3. त्यांनी राजकारण्यांच्या धावपळीच्या जीवनाचा आरोग्यावर होणारा परिणामही अधोरेखित केला.

Ratnagiri News : चिपळूणमधील एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांची तब्ब्येत बिघडली होती. त्यांना अचानक भोवळ आल्यानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेत कार्यक्रम सोडला होता. यानंतर याची राज्यभर चर्चा झाली होती. आता याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राजकारण्यांच्या धावपळीच्या जीवनावर आणि नारायण राणेंशी असलेल्या जुन्या संबंधांवर भाष्यही केले आहे. भास्कर जाधव यांनी, राजकारणात काम करताना अनेकदा मतभेद होतात, काही गोष्टींमुळे कटुता येते. मात्र मनात कुठेतरी जिव्हाळा कायम असतो, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकताच तळकोकणात नारायण राणे समर्थकांनी भव्य रॅली आणि त्यानंतर भव्य जाहीर सभा घेत राणेंची राजकीय ताकद काय आहे ती विरोधकांना दाखवून दिली होती. पण यावेळी राणेंनी आता थांबायला हवं असे म्हणत निवृत्तीचे संकेत दिले होते. ज्यामुळे महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपची चिंता वाढली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करता आपण असे बोललोच नाही असे म्हणत निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

याचवेळी त्यांची तब्येत काहीशी ढासळलेली दिसत होती. दरम्यान ऐन भाषणाच्यावेळी त्यांना अचानक अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले होते. यावरून आता उलट सुलट चर्चा रंगल्या असतानाच भास्कर जाधव यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhaskar Jadhav And Narayan Rane
Bhaskar Jadhav role controversy : शिवसेना फुटीवेळी आम्ही ठाकरेंबरोबर, भास्कर जाधवांचा बैठकीत आरडाओरडा अन्..; जयस्वालांनी शपथ घेऊन सांगितला प्रसंग!

त्यांनी जुने ऋणानुबंध पूर्णपणे पुसता येत नाहीत असे म्हणत, मी आणि नारायण राणे यांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. ही वस्तुस्थिती असून आमचे केवळ राजकीयच नाही, तर कौटुंबिक संबंध असल्याचे म्हटलं आहे. राणे साहेबांना आपल्यातील बेधडक वागणं, स्पष्टपणे बोलणं आणि आक्रमक बाणा नेहमीच आवडत आला आहे.

आमच्या वयात केवळ ५ ते ६ वर्षांचे अंतर असून राजकीय प्रवासात आमच्यात अंतर पडले, बोलण्यात कटुता आली. मात्र जुने ऋणानुबंध पूर्णपणे पुसले जात नाहीत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाच सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Bhaskar Jadhav And Narayan Rane
Bhaskar Jadhav : 151 पैकी फक्त 17 नगरसेवक! कोकणात झालेल्या शिवसेनेच्या वाताहतीला शिंदेच जबाबदार, ठाकरेंच्या शिलेदाराचा हल्लाबोल

FAQs :

1. चिपळूणमध्ये नेमके काय घडले?
→ एका कार्यक्रमात नारायण राणेंना अचानक भोवळ आल्याने त्यांची तब्येत बिघडली.

2. भास्कर जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली?
→ राजकीय मतभेद असले तरी मनात जिव्हाळा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

3. भास्कर जाधव कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
→ ते ठाकरे गटाचे आमदार आहेत.

4. या वक्तव्यातून कोणता संदेश जातो?
→ राजकारणापलीकडे मानवी नाते आणि माणुसकी महत्त्वाची असल्याचा संदेश जातो.

5. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
→ थेट राजकीय परिणाम नसला तरी संवेदनशीलतेचे उदाहरण समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com