Ajit Pawar : अजितदादा हेडगेवार अन् गोळवलकरांना अभिवादन करण्यासाठी रेशीमबागेत जाणार? 'ही' माहिती आली समोर

Nagpur Winter Session : अजित पवार भाजपच्या कार्यक्रमाला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष...
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अजित पवारांसह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरीची वाट निवडल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या फुटीनंतर अजित पवार गट भाजप -शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थखातंही पदरात पाडून घेतले. तेेव्हापासून ते आजतागायत अजित पवारांनी भाजपची विचारसरणी जवळ केल्याचा आरोप केला जात आहे.

मात्र, अजित पवारांनी आपण सत्तेत सहभागी असलो तरी आपली फुले-शाहू- आंबेडकर या विचारसरणीपासून दूर गेलो नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. तरीदेखील विरोधकांचे टीका-टिप्पणी काही थांबलेली नाही. याचदरम्यान, आता मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजपकडून सर्व आमदारांना रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार व संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्याकरिता मंगळवारी (ता.19) उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आले आहेत. पण आता या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) येथे जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar News
Lok Sabha Election : विकासकामांतून पॉकेटमनीसाठी पैसे; मनसे आमदाराचा मुख्यमंत्री पुत्रावर गंभीर आरोप

भाजपचे मुख्यप्रतोद आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते.या कार्यक्रमाला भाजपसह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदारही उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. पण अजित पवारांनी यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या ध्येयधोरणांवरही जोरदार प्रहार केलेला आहे. हे सगळे पाहता अजित पवार रेशीमबाग येथे जाणार नसण्याचीच शक्यता आहे.

...म्हणून भाजपच्या कार्यक्रमातून काढता पाय!

अजित पवार भाजपच्या(BJP) कार्यक्रमाला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष होतं.परंतु,आता त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते रेशीमबागेत जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी भाजपचे सर्व आमदार डॉ.हेडगेवार व गोळवलकर गुरुजींना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.पण आता नियोजित कार्यक्रमातून अजित पवारांनी जरी काढता पाय घेतला असला तरी त्यांच्या गटाचे आमदार या कार्यक्रमाला जाणार का याबाबतची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या आजोळचे संघाशी घनिष्ठ संबंध...

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक कै.मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातल्या मोतीबागेत गेले होते. यानंतर ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. मात्र, त्यांच्या आजोळचे फार पूर्वीपासूनच संघाशी घनिष्ठ संबंध आहेत.

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे दादांचे अजोळच आहे. या आजोळचे अन मोतीबागेचे वर्षानुवर्षांचे स्नेहसंबंध आहेत. संघ विचारावरील श्रध्देपोटी अजित पवारांचे मामा अण्णासाहेब कदम यांनी एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाला नम्रपणे नकार दिला.त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी संघ परिवारात कार्यरत रहाणे पसंत केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar News
Dawood Ibrahim : डोंगरी टू कराची व्हाया दुबई... मुंबई पोलिसांना घाबरून पळाला होता दाऊद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com