कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

Shivena : महेश कांदळगावकर यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांना हा धक्का मानला जात आहे.
Mahesh Kandalgaonkar
Mahesh KandalgaonkarSarkarnama

मालवण : मागील पाच वर्षे मालवण (Malvan) शहराचे नेतृत्व करणारे मावळते नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज (ता.20 एप्रिल) आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रसारमाध्यमांना देताना मात्र, या विषयावर कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. येत्या काही कालावधीत मालवण नगरपरिषदेची निवडणूक होणार असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नगरपालिकेचा कारभार केला, त्या तत्कालीन नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेत मात्र, एकच खळबळ उडाली आहे.

Mahesh Kandalgaonkar
AIMIM : राज ठाकरेंच्या सभेवर एमआयएमच्या `हाताची घडी तोंडावर बोट`चे रहस्य काय ?

महेश कांदळगावकर यांनी कौटुंबिक कारणांमुळे शिवसेना सोडत असल्याचं म्हटलं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून मालवण शिवसेनेत मोठी गटबाजी उफाळून आली होती. काही राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, तर या गटबाजीत वाढ झाली होती. याच गटबाजीतून कांदळगावकरांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याचं बोललं जात आहे.

Mahesh Kandalgaonkar
एकनाथ शिंदेंना पुढं करुनही राठोडांना मंत्रिपद नाही; विदर्भातील चार आमदारांची नावे आघाडीवर

मालवणमध्ये निवडणुकीच्या तोंडावर कांदळगावकर यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली असून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना हा धक्का मानला जात आहे. मात्र, राजीनामा का दिला याबाबत कांदळगावकरांनी स्पष्ट असे काही कारणा सांगितले नाही. आता त्यांची शिवसेनेकडून मनधरणी केली जाते की ते त्यांचा मार्ग निवडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com