अजितदादाच्या 'त्या' विधानावर भाजप आक्रमक; वाहनांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर लावून आंदोलन

Nitesh Rane : सिंधुदुर्गमध्ये आमदार नितेश राणे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : धर्मवीर शब्दामुळे सुरू झालेला वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर वाहनांवर लावून आंदोलन केले आहे. अनेक वाहनांवर अशी स्टीकर लावण्यात आली असून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते, असं म्हटलं होतं. यानंतर त्यांच्या या विधानाच्या विरोधात राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत.

Nitesh Rane
Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा संजय शिरसाटांनी सांगितला मुहूर्त

आता सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाहनांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी स्टीकर लावण्यात आली आहेत. अशाप्रकारे संपूर्ण राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांवर स्टिकर लावण्यात येतील ही मोहीम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येईल, अशी माहिती नितेश राणे यांनी यावेळी दिली.

Nitesh Rane
Sanjay Raut News : शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील ; राऊतांचा दावा

दरम्यान, अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली. तसेच त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने देखील करण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या या विधानावर भाजप (BJP) आणि शिवसेनेचा शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com