Sanjay Raut News : शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील ; राऊतांचा दावा

Sanjay Raut News : शिंदेंकडे गेलेले आमदार भाजपमध्ये जातील
sanjay raut, eknath shinde Latest News
sanjay raut, eknath shinde Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. आज (शनिवारी) त्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, "शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. राज्य सरकार ‘व्हेंटिलेटर’आहे. त्यांचे सोळा आमदार लवकरच अपात्र ठरतील. त्यांच्या अनेक मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. शिवसेना एकच आहे, एकच राहिल. गट नाही, गट हे तात्पुरते खेळ आहेत.

sanjay raut, eknath shinde Latest News
Congress News : 'भारत जोडो यात्रे' नंतर प्रजासत्ताक दिनापासून काँग्रेसचे हे नवीन अभियान सुरु होणार

" शिवसेना हा वटवृक्ष आहे.शिवसेनेतून जे फुटले ते कचरा, निरुपयोगी होते, ज्यांनी शिवसेना सोडली ते कचऱ्यासारखे आहेत .राज्यात सरकार अस्तिवात नाही. सरकारमध्ये दोन गट पडलेले आहेत. शिंदेंकडे गेलेले आमदार भाजपमध्ये जातील, " असे राऊत म्हणाले.

sanjay raut, eknath shinde Latest News
Girish Mahajan News : 'मार्ड'च्या डॉक्टरांसाठी गुड न्यूज ; निवासी डॉक्टरांची तब्बल एवढी पदे भरणार

मी राणेंना एकदाही भेटलो नाही..

सध्या संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात सध्या शाब्दीक युद्ध सुरु आहे.संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये 'माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र उतरवून या,', असे म्हणत पलटवार केला होता.

राणेंबाबत आज राऊत म्हणाले, "राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मी राणेंना एकदाही भेटलो नाही. त्यांची भाषा अयोग्य आहे. राणेंबाबत संयम राखला. त्यांनी मर्यादा सोडली आहे. आमच्यावर आरोप करणे हे तुमचं काम नाही, आमच्या नादाला लागू नका. राणे लाचार माणूस आहे. सहा पक्ष बदलले आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com