वैभव नाईक पुन्हा जायंट किलर : नारायण राणेंचे कट्टर राजन तेली पराभूत

भाजपला ७ जागा आणि महाविकास आघाडीला आतापर्यंत ५ जागा मिळाल्या आहेत.
Vaibhav Naiks, Narayan Rane

Vaibhav Naiks, Narayan Rane

sarkarnama

Published on
Updated on

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा (Sindhudurg District Bank Election) बँक निवडणुकीच्या मत मोजणी सुरु आहे. त्यामध्ये आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला आहेत तर सुशांत नाईक विजयी झाले आहेत.

सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून सुशांत नाईक विजयी झाले आहेत. भाजपला ७ जागा आणि महाविकास आघाडीला आतापर्यंत ५ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे (BJP) सिद्धिविनायक पॅनेलच आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात ही निवडणूक होत आहे. शिवसेनेचे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Naiks, Narayan Rane</p></div>
ज्यांच्यावरून राणे कुटंबीय अडचणीत आले ते सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत

सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. वैभव यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बॅंक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रीक केल्याचे आज स्पष्ट झाले.

दरम्यान, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत (Satish Sawant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप दोघांमध्ये चुरस होती. कणकवली येथे सतिश सावंत यांचा पराभव नशिबाचा कौल ठरला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, राण तेली यांच्या पराभवामुळे त्यांना धक्का बसला आहे.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Naiks, Narayan Rane</p></div>
मोठी बातमी! ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंधात वाढ, वाचा सविस्तर

सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच नितेश राणे अडचणीत आले होते. त्यामुळे सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com