BJP-MLA power deal : 'ZP' च्या निवडणुकीत सत्तेसाठी निष्ठावंतांचा बळी? आमदाराची सुनेसाठी सौदेबाजी, भाजप उमेदवाराच्या माघारीने कार्यकर्त्यांमध्ये संताप

Zilla Parishad elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोकणात सत्तेसाठी तडजोडीचे राजकारण उघड झाले आहे. यामुळे नेत्यांनी निष्ठावंतांचा बळी देत उघड सौदेबाजी केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
Zilla Parishad Elections
Zilla Parishad Electionssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप-शिंदे गटात सत्तेसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिल्याचे आरोप उघडपणे चर्चेत आले आहेत.

  2. स्थानिक आमदाराने आपल्या सुनेला जिल्हा परिषदेत निवडून आणण्यासाठी राजकीय सौदेबाजी केल्याची चर्चा आहे.

  3. या घडामोडींमुळे प्रियदर्शनी पाटील यांनी जिल्हा परिषद उमेदवारी मागे घेऊन पंचायत समितीकडे मोर्चा वळवला आहे.

Raigad News : एकीकडे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतदानाला आठवडा शिल्लक असतानाच कोकणात मात्र भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. येथे सत्तेसाठी तडजोडी आणि उघड उघड सौदेबाजीला उत आला आहे. भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा आपल्या कुटुंबातील उमेदवार निवडून आणण्यासाठी निष्ठावंतांचा बळी देणारा निर्णय घेतल्याची जाहीरपणे चर्चा होताना दिसत आहे.

स्थानिक आमदाराने आपल्या सुनेसाठी भाजपच्या तगड्या उमेदवारासोबत थेट हातमिळवणी केली आहे. त्यांच्या सत्तासमझोता एक्सप्रेसनंतर भाजपच्या प्रियदर्शनी पाटील यांनी माघार घेतल्यानंतर येथे वाद वाढला असून त्या पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. पण हे फक्त आमदाराच्या सेटलमेंटचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून येथे भाजप-राष्ट्रवादी एकत्र आहेत. तर शिंदेंची शिवसेना काही ठिकाणी भाजपसोबत आहे. तर काही ठिकाणी वेगळी लढताना दिसत आहे.

Zilla Parishad Elections
Raigad Zilla Parishad Election : ठाकरेंचा उमेदवार भाजपने पळवला! ‘शेकाप’चा संताप, पनवेल तहसीलवर थेट राडा

पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीआधीच येथे राजकीय देवाणघेवाण सुरू झाली असून ज्याचा सर्वाधिक फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसताना दिसत आहे. ज्याचे उदाहरण म्हणून मोठ्या अपेक्षेने शिवसेनेत प्रवेश केलेल्या चेंढरेतील मृणाल पाटील कुटुंबियांचे दिले जात आहे.

येथे एकीकडे फक्त सत्ताधाऱ्यांनी आपल्या कौटुंबिक हितासाठी घरातली उमेदवारी सुरक्षित ठेवण्याचे काम केले. तर स्थानिक पातळीवरील ताकद असणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम केल्याची खदखद कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे भाजपमधील काही नेत्यांची स्वतःच्या निवडणुकीबाबत शाश्वती दिसत नसल्यानेच थेट आपल्या भावाचाच राजकीय बळी दिल्याचे दिसत आहे. फक्त आपला राजकीय मार्ग सुकर व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत सहकार्याचा शब्द देण्यात आल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

Zilla Parishad Elections
Zilla Parishad Election : ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष? साड्या वाटपाचा धक्कादायक प्रकार, भरारी पथकाची पाठलाग करत मोठी कारवाई

FAQs :

Q1. भाजप-शिंदे गटावर नेमके कोणते आरोप होत आहेत?
👉 सत्तेसाठी उघड सौदेबाजी करून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिल्याचे आरोप होत आहेत.

Q2. ही सौदेबाजी कोणासाठी करण्यात आल्याची चर्चा आहे?
👉 स्थानिक आमदाराने आपल्या सुनेला जिल्हा परिषदेत निवडून आणण्यासाठी तडजोड केल्याची चर्चा आहे.

Q3. प्रियदर्शनी पाटील यांनी जिल्हा परिषद उमेदवारी का सोडली?
👉 आमदारांच्या राजकीय सौद्यामुळे आपली संधी कमी असल्याने त्यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

Q4. याचा परिणाम कोणत्या निवडणुकीवर होणार आहे?
👉 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Q5. भाजप किंवा शिंदे गटाची अधिकृत प्रतिक्रिया आली आहे का?
👉 सध्या तरी या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com