
Sindhudurg News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रासह जम्मू काश्मीरमध्ये देखील निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध आता जगभरात केला जात असतानाच केंद्रातील मोदी सरकाने पाकिस्तानला धडा शिकवणारे मोठे पाच निर्णय घेतले. यावरून आता पाकिस्तानला अद्दल येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांचे स्वागत करताना दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर टीका केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले असनाचा नागरीक आता रस्त्यावर उतरले आहे. जनता संताप व्यक्त करत आहे. अशावेळी नितेश राणे काँग्रेसला डिवचताना, हा नवा भारत असून येथे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे. आता घेतलेले निर्णय बघा, पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने भारताकडे बघणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवला जाईल, असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
नितेश राणेंनी यांवेळी देशात पंतप्रधान मोदींचे सरकार आल्यापासून आपल्या देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काही काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांचे सरकार नाही किंवा गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही. हे मोदीजींचं सरकार आहे. 2014 नंतर ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघितलं त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानला मोदीजी असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा आबा पण आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्यासह निशाना साधला होता. त्यांनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला. यावर देखील नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल करताना, राऊत यांचा उल्लेख शेंबड्या लोकांना असे केला आहे.
तसेच राऊत यांच्या सारख्या शेंबड्या लोकांना, भांडुपच्या देवानंदला पत्रकार देशाचे प्रश्न विचारतात. पण राऊत यांना देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार. मात्र जेव्हा देशात कोरोना आला होता. तेव्हा बाधितांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी यांचा मालक मुख्यमंत्री होता. मग का नाही दिला राजीनामा. आता कोणत्या तोंडाने हे अमित शाह यांचा राजीनामा मागतायतं असाही सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
जनतेनं मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे, हे काय मनमोहन सिंगांचे किंवा कुण्या लेच्या-पेच्याचे सरकार नाहीये, हे कणखर देशभक्तांचं, राष्ट्रभक्तांचं सरकार आहे. त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही, असाही दावा नितेश राणे यांनी केला आहे.
मंगळवारी (ता.22) जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. ज्यात 26 जणांचे प्राण गेले. यामुळे आता केंद्रातील मोदी सरकाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. ज्यामध्ये सिंधु पाणी वाटपाचा करार स्थगित करण्यात आला आहे. त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद करण्यासह 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.