Nitesh Rane : राज-उद्धव एकत्र येणार? नितेश राणे म्हणाले, 'हा' स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम...

Nitesh Rane targets Raj Thackeray, Uddhav Thackeray over possible alliance : दोन्ही ठाकरे एकत्र येऊन काय फरक पडणार आहे. दोघे एकत्र आले काय किंवा नाही आले काय? काही फरक पडत नसल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnma
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघेही भाऊ एकत्र यावेत अशा चर्चा झाल्या आहेत. मात्र यापूर्वी स्वत: राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यासंदर्भात कधी सकारात्मक सूर आला नव्हता.

मात्र आज एका मुलाखतीत बोलताना, आमच्यातली भांडणं खूप छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते असे म्हटले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांना जोर आला आहे. त्यावर विचारले असता नितेश राणे म्हणाले, दोन्ही ठाकरे एकत्र येऊन काय फरक पडणार आहे. दोघे एकत्र आले काय किंवा नाही आले काय? महाराष्ट्रासाठी व हिंदुत्वासाठी कोणी एकत्र येत आहे का? तर नाही...हा स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.

Nitesh Rane
Nashik Trimbakeshwar Kumbh Mela : केंद्र सरकारचे आभार.. ! उशीरा का होईना पण कुंभमेळ्याला सहकार्य करण्याची दिली 'ग्वाही'

राणे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आतापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आले आहेत. आम्ही त्यांना जिहादी ह्रदयसम्राट म्हणतो. ..आणि म्हणूनच महाकुंभवर टीका करायची आणि उद्धव ठाकरेंसारख्या जिहाद्याला खूश करायचं. हिंदू विचारांच्या विरोधात असलेले जेवढे हे जिहादी विचाराचे लोक आहेत ते जर एकत्र येऊन हिंदु्त्वाला आव्हान देत असतील तर हिंदूंत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भारतीय जनता पक्षातील हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते सज्ज आहोत.

कारण एकत्र येण्याचा कार्यक्रम हा नेमका हिंदुत्व, मराठी माणसासाठी आहे की, जिहाद्यांना ताकत देण्यासाठी आहे, जे जोर जबरदस्तीने इस्लामीकरण करतात त्यांना ताकत देण्यासाठी आहे. त्या बद्दल स्पष्ट भूमिका असली पाहिजे असं नितेश राणे म्हणाले

मराठी माणसासाठी दोघे एकत्र येत असल्याचे विचारले असता नितेश राणे म्हणाले, त्यांना फार लवकर मराठी माणूस आठवला. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी व हिंदूत्वासाठी शिवसेना नावाची संघटना सुरु केली आणि तुम्हाला आता मराठी माणूस व हिंदू समाज आठवला असा प्रश्न राणे यांनी केला.

Nitesh Rane
Maharashtra Samruddhi Mahamarg : महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला मिळणार मोठी भेट, सीएम फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट येणार सेवेत...

नितेश राणे म्हणाले की राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येवो किंवा न येवो आम्हाला काहीही फरक पडत नाही. हिंदू समाजाच्या विविध घटकांना मारुन हिंदुत्व बळकट होणार आहे का? एवढा हिंदीच्या सक्तीला विरोध असेल, तर नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जावून तिथे ऊर्दु भाषेची सक्ती बंद करुन मराठीची सक्ती त्यांनी करावी. बेहरामपाड्यात जाऊन सांगा व तिथे मराठीची सक्ती करा. हिंदू समाजाच्या लोकांना का मारताय? हिंदूंमध्ये का फूट पाडता? जिहाद्यांना मदत करण्यासाठी का असं राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com