Konkan Politics : ‘आता मजा बघा... Landing Shortly’ : उद्योगमंत्र्यांच्या भावाचा इशारा कोणाला?

Kiran Samant Post : किरण सामंत यांचे रत्नागिरीमध्ये नेमकं चाललंय काय?
Kiran Samant
Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : शिवसेनेचे (शिंदे गट) नेते, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी फेसबुकवर अनेक वेगवेगळ्या पोस्ट केल्याने त्याची चर्चा सध्या सुरू आहे. किरण सामंत यांचे रत्नागिरीमध्ये नेमकं चाललंय काय, याची उत्सुकता अनेकांना आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. मात्र भाजपकडूनही या जागेवर दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सामंतांच्या विविध पोस्ट हा चर्चेचा विषय ठरला आहे. 'आता मजा बघा... Landing shortly' ही लाईन त्यांनी व्हॉट्सॲप स्टेट्‌सला ठेवली आहे. पण, किरण सामंत कुठे लॅंड होणार? आणि हा इशारा कोणासाठी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Kiran Samant's Facebook posts came into discussion)

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. ‘भावी खासदार’ असा उल्लेख करीत अलिकडेच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीही करण्यात आली होती. या प्रकारानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही महायुतीमधील कोणीही कोणतेही वक्तव्य न करता, बॅनरबाजीही करू नये, अशा शब्दांत कान टोचले होते. (Kiran Samant Post)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kiran Samant
Sadavarte Attack Raj Thackeray : मराठा आरक्षणाविरोधात बोलता बोलता गुणरत्न सदावर्ते राज ठाकरेंवर घसरले...

काही महिन्यांपूर्वी किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मशालीचा फोटो ठेवून मोठा धमाका केला होता. त्यानंतर कालपासून त्यांनी विविध प्रकारच्या पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर केल्या आहेत. त्याची चर्चा रत्नागिरीत सुरू आहे.

सोनं अंगावर घातलं; म्हणून माणूस मौल्यवान होतो, असं नाही, तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारातसुद्धा असायला हवी... ही पोस्ट त्यांनी काही वेळापूर्वी केली आहे.

घंटा... मी लक्षात ठेवत नाही, हिशेब करतो...

...ज्यावेळी एखाद्याला मेहनत न करता लायकीपेक्षा जास्त मिळते, तेव्हा त्याचा भाव वाढतो, स्वभाव बदलतो...

कुणीही गैरसमज करून घेऊ नये, असं म्हणत साला ‘आजकाल दिवस बदलले आहेत... संडास मालकाचा आणि रुबाब संडास साफ करणाऱ्याचा’ ही पोस्ट त्यांनी काल फेसबुकवर केली आहे.

Kiran Samant
BJP VS Congress : येणार होते दादा... आले मात्र अण्णा...!

किरण सामंत यांनी पोस्टच्या माध्यमातून हे इशारे कोणाला दिले असून टोमणे नेमके कोणाला मारले आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कधी राजकारणात थेट समोर न येता कोणतेही थेट भाष्य न करणारे किरण सामंत नेमके कोणावर नाराज आहेत, याची चर्चा सध्या रंगली आहे.

Kiran Samant
Manoj Jarange Speech On Maratha Reservation : 'विजयी गुलालाचा अपमान होणार नाही...'; जरांगेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या चर्चेनंतर किरण सामंत यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या राजापूर-लांजा मतदारसंघातही आपले लक्ष केंद्रित केले आहे. किरण सामंत यांच्यासाठी त्यांच्या कन्या अपूर्वा सामंत याही मैदानात उतरल्या आहेत. बाबा तुला या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातही खूप मोठं काम सर्वसामान्य जनतेसाठी करावे लागणार आहे, अशी भावनिक साद त्यांची कन्या अपूर्वा सामंत यांनी चार दिवसांपूर्वी झालेल्या भाषणातून घातली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Kiran Samant
Jarange Patil's Mother Reaction : महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा-बाळांचं कल्याण झालं; मनोज जरांगेंच्या आईची प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com