Video Rajan Teli Vs Deepak Kesarkar: महायुतीत ठिणगी; 'सावंतवाडी' कुणाची? दीपक केसरकर अन् राजन तेली यांच्यात जुंपली

Sawantwadi Assembly constituency Rajan Teli on Deepak Kesarkar:'तुम्ही ज्या ज्या वेळी माझी तक्रार केली, त्या त्या वेळी पक्षाने मला बढती दिली. त्यामुळे तुम्ही माझी तक्रार कराचं...
Rajan Teli Vs Deepak Kesarkar
Rajan Teli Vs Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार, यावरुन भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी 'सावंतवाडी'वर दावा ठोकला आहे.

शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे ? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांना डिवचलं आहे. कोकणात सावंतवाडी विधानसभेवरुन महायुतीत ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्गात भाजपला लोकसभेला मिळालेल्या यशानंतर सावंतवाडी विधानसभा (Sawantwadi Assembly Constituency) मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. राजन तेली यांनी दोन वेळा सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

आता सावंतवाडी विधानसभा भाजपला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी या मतदारसंघात भाजपचं कसे वर्चस्व आहे, आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे प्रत्येक निवडणुकीत कसे मताधिक्य घटले, याकडे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष वेधलं आहे.

Rajan Teli Vs Deepak Kesarkar
Nilesh Lanke: राजकारणाच्या मैदानात सुजय विखे यांना चितपट करणारे नीलेश लंके कबड्डीच्या डावात 'बाद'

राजन तेली यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच मुंबईत भेट घेऊन याकडे त्यांचे लक्ष वेधलं. सावंतवाडी मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात महायुतीत सगळं काही आलबेल नाही हे दिसते. पण, केसरकर यांनी सावध पवित्रा घेत निवडणुकीला इच्छुक असणं गैर नाही, मात्र युतीधर्म पाळावा अशी भूमिका घेतली आहे.

तेली यांची भाजपमधून हकालपट्टी करा...

दुसरीकडे केसरकरांनी राजन तेली यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे ? त्यांना आमदार व्हायचंय म्हणून पातळी सोडून ते टीका करतात. महायुती अडचणीत असताना चुकीची वक्तव्य कुणी करू नये, राजन तेली यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे,असे सावंतवाडीचे आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Rajan Teli Vs Deepak Kesarkar
Sanjay Shirsat: धक्कादायक: आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक

माझी तक्रार केली, अन् पक्षानं मला बढती दिली..

राजन तेली यांनी केसरकर यांच्यावर पलटवार केला आहे.'तुम्ही ज्या ज्या वेळी माझी तक्रार केली, त्या त्या वेळी पक्षाने मला बढती दिली. त्यामुळे तुम्ही माझी तक्रार कराचं असे खुले आव्हान केसरकरांना तेली यांनी दिले आहे. केसरकर यांना शिक्षण विभागाचे काही कळत नाही त्यामुळे मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राजन तेली यांनी माध्यमांना सांगितले. केसरकर आणि तेली यांच्या सावंतवाडी कुणाची यावरुन सुरु असलेला वाद टोकाला गेला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीत सध्या आलबेल नसल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com