Zilla Parishad elections : मतदान सुरू असतानाच भाजपने डाव टाकला; कोकणात अजितदादांसह शिंदेंना धक्का

BJP Vs NCP-Shivsena And Shekap Politics : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असली तरी अद्याप ठोस उत्तर मिळालेले नाही.

  • शिंदेसेनेलाही 19 जागांचा प्रस्ताव देऊन आठवडा उलटला तरी प्रतिसाद न आल्याने भाजप 37 जागांवर स्वबळावर लढण्यास सज्ज आहे.

  • रायगड जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच शेकापने माणगाव तालुक्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

Raigad Zilla Parishad elections News : राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीचे मतदान होत असून उद्या काय निकाल लागणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर जेथे महानगरपालिका नाहीत तेथे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चर्चांची खलबतं केली जात आहेत. अशातच जागांच्या प्रस्तावावर महायुतीसह महाविकास आघाडीत विसंवाद दिसत असून यामुळे मित्र पक्षांची डोकेदुखी वाढण्याचे चित्र दिसत आहे. भाजप महायुतीची कोंडी करताना दिसत असून शेकापने वेगळी चूल मांडत माणगावसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे आता येथे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकताच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष अॅक्टीव्ह मोडवर आले असून सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाल्याचे समोर आले होते. तर शिंदेंच्या शिवसेनेला नगर परिषद आणि नगर पंचायतीप्रमाणेच आताही युतीत घेण्यात आलेले नाही. पण आता भाजपनेच वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्याने एकाच वेळी शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांना धक्का बसला आहे.

नुकताच खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपशी बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे भाष्य केले होते. तसेच भाजपकडून २१ जागांचा प्रस्ताव देखील देण्यात आल्याचे समोर आले होते. तसेच भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेलाही हात देत १९ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीने अद्याप उत्तर दिले नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आठवडा झाला तरी काहीच सांगण्यात आलेले नाही. यामुळे आता भाजपकडून सर्वच्या सर्व (३७) जागा लढवल्या जातील अशी घोषणा भाजपचे संघटक मंत्री सतीश धारप यांनी केली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Zilla Parishad Elections : जिल्हा परिषदेची निवडणूक लांबली, इच्छुकांची धाकधुक वाढली; पालघरमध्ये संभाव्या उमेदवार चिंतेत!

तसेच धारप यांनी, पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढले होते. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक ही महायुती म्हणून लढा, असे आदेश वरिष्ठांनी दिले होते. पण राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणतेच उत्तर न आल्याने आता निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

युतीबाबत संभ्रम...

वरिष्ठांनी जिल्हा परिषद निवडणूक ही महायुती म्हणून लढा असे आदेश दिल्याने राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप उत्तर आलेले नाही. दोन दिवसांपूर्वी तटकरे यांनी अलिबागमध्ये युतीसाठी चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे विधान केले होते. मात्र, आता धारप यांच्या व्यक्तव्याने युती होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

एकीकडे भाजपने जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी केली असतानाच आता शिवसेनाही एकला चलोच्या मूडमध्ये दिसत आहे. शिवसेनेनं अलिबागमध्ये सहा उमेदवारही जाहीर केले आहेत. यामुळे आता महायुती घटक पक्ष हे जिल्हा परिषद निवडणुकीतही वेगळे लढणार की युती करणार हे पाहावं लागणार आहे.

शेकाप स्वबळावर...

दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष आणि उमेदवार तयारीला लागले असतानाच शेतकरी कामगार पक्षाने स्वबळाची घोषणा करत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. माणगाव तालुक्यातील मोर्बा आणि तळाशेत या जिल्हा परिषद गणात शेकाप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे शेकाप नेते निजाम फोफलुनकर यांनी जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडी कोणता निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी फोफलुनकर यांनी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहे. त्यासाठी कार्यकर्तेही सज्ज असल्याचेही फोफलुनकर यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Zilla Parishad election: निवडणूक आयोगाची कोर्टात धाव, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य, म्हणाले,...

FAQs :

1. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी युती होणार का?
सध्या युतीबाबत चर्चा सुरू असून अजित पवार गटाकडून अद्याप उत्तर आलेले नाही.

2. भाजपने किती जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे?
भाजप 37 जागांवर स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

3. शिंदेसेनेला किती जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता?
शिंदेसेनेला 19 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता.

4. शेकापने कोणत्या तालुक्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे?
माणगाव तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

5. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षांची तयारी कशी आहे?
सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवार निवड व प्रचाराची तयारी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com