मंचरचा पहिला नगराध्यक्ष होणार खुल्या गटाचा!

काही इच्छुकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून नियोजित वॉर्डातील मतदारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे.
Nagar Panchayat election
Nagar Panchayat electionsarkarnama

मंचर (जि. पुणे) : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat Election) नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची (Reservation) सोडत गुरुवारी (ता. २७ जानेवारी) काढण्यात आली. खुल्या प्रवर्गासाठी १०९ ठिकाच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीचा समावेश असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. काही इच्छुकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून नियोजित वॉर्डातील मतदारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. (Manchar Nagar Panchayat president post is reserved for open category)

मंचरची ग्रामपंचायत १९२२ मध्ये अस्तित्वात आली आहे. सुलतान अली मिर्झा यांनी पहिले सरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर आनंदराम समदडीया, माजी खासदार लोकनेते (स्व.) किसनराव बाणखेले, रामभाऊ धोंडीबा बाणखेले, हिदायत अली इनामदार, बाळासाहेब मोरडे, टी. के. थोरात, महादू विठ्ठल निघोट, लक्ष्मणराव गांजाळे, कैलास गांजाळे, बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले, मीरा बाणखेले, अश्विनी शेटे, दत्ता गांजाळे, किरण राजगुरू आदींनी मंचरचे सरपंचपद भूषविले आहे.

Nagar Panchayat election
अध्यक्षमहोद्‌य, १२ आमदारांच्या नियुक्त्यांसाठीही आवाज उठवा : मातोंडकरांचा फडणवीसांना टोला

मंचरची वाटचाल वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाकडे सुरु आहे, त्यामुळे मंचर ग्रामपंचायतीचे तब्बल १०० वर्षांनंतर नगरपंचायतीत रुपांतर झाले आहे. प्रथमच होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. कारण, मंचर शहरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे दरवाजे बंद झाले आहेत, त्यामुळे नगरपंचायतीत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे.

Nagar Panchayat election
जयंत पाटलांचा माजी आमदार दानवेंना दणका

नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले, दत्ता गांजाळे, सुनील बाणखेले, सुहास बाणखेले, वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, कैलास गांजाळे, अजय घुले, संतोष बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्ते, राजेंद्र थोरात, गोकुळ बाणखेले, सचिन काजळे, राजू इनामदार, अल्लू इनामदार, मन्सूर शेख, संजय थोरात, बाबू थोरात, प्रवीण थोरात, माणिक संतोष गावडे, ज्योती निघोट, अश्विनी शेटे, मालती थोरात, माया देठे इच्छुक म्हणून नावे चर्चेत आली आहेत. या पैकी काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या टीम तयार केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. मंचरमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com