"सोळा कोटींचा व्यवहार कायदेशीर"; आरोप होताच भाजप आमदाराचे स्पष्टीकरण

गुन्हा दाखल झालेला एफआयआर शोधून दाखवण्याचे दिले आव्हान
Mahesh Baldi
Mahesh Baldi Sarkarnama
Published on
Updated on

रायगड : खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्ट जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार केल्याचे उरणचे भाजप (BJP) आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांच्याकडून हे आरोप होत आहेत. या जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील (Mumbai) एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त आहे. मात्र आमदार बालदी यांनी या सर्व वृत्ताचे खंडन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडीवाला ट्रस्टची शेकडो एकर जागा नवी मुंबई परिसरात आहे. यापैकी बहुतेक जागा ही सिडकोच्या कार्यक्षेत्रात येते. मात्र ट्रस्टमधील एका सदस्याने बनावट कागदपत्रे तयार करून ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरून ट्रस्टच्या नावाची नोंद हटवली. त्यानंतर त्याने या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे १२.५० टक्के योजनेंतर्गत भूखंडांची मागणी केली. खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून या ट्रस्टीने काही भूखंड बिल्डरांना विकून टाकले, असा आरोप होत आहे.

Mahesh Baldi
ED:ठाकरे सरकारची झोप उडविणारं मनी लाँड्रिंग प्रकरण नेमकं काय आहे?

उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनीही २०१८ साली डोसू भिवंडीवाला यांच्याकडून ट्रस्टची सुमारे २२ एकर जागा १६ कोटी ४५ लाख रुपयांना खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांनी मुंबईतील एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारही दाखल केली. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचा दावा करण्यात येत आहे. आहे. यामुळे आमदार महेश बालदी यांच्यासह ट्रस्टची जागा घेणाऱ्या अन्य बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Mahesh Baldi
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई बाबत अमित शहांनी स्पष्टच सांगितले

याबाबत बोलताना आमदार बालदी म्हणाले, माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले, खरेदी केलेली जमिन ही भिवंडीवाला ट्रस्टच्या मालकीची नव्हती. ती डोसू यांच्या खाजगी ट्रस्टच्या मालकीची जागा आहे. त्यामुळे झालेला जमिनीचा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आहे. अशा प्रकराच्या अफवा मागच्या ४ वर्षांपासून उठत असून प्रत्येक ६ महिन्यांनी असा गुन्हा दाखल झाला असल्याची बातमी येत असते. मात्र आजच्या तारखेला एल.टी मार्ग पोलिस स्थानकात माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com