Narayan Rane : दाऊदला 'टीप', उपशाखाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, शिवसेनाप्रमुखांची विनंती अन् जीवनदान; नारायण राणेंचा नेमका काय आहे किस्सा!

Narayan Rane recalls Balasaheb Thackeray’s advice : दोन्ही मुले चांगल्या प्रकारे राजकारणात सक्रीय झाले असून दोन्ही मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे! असे विधान केले होते. यावरून त्यांनी आपल्या राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
Balasaheb Thackeray and Narayan Rane
Balasaheb Thackeray and Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी कोकणात मोठं शक्तीप्रदर्शन केलं.

  • कणकवलीतील कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

  • “मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरे यांनी मला थांबवलं,” असा धक्कादायक किस्सा त्यांनी सांगितला.

Sindhudurg News : मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असून भाजपला रोखण्यासाठी ही रणनीती ठाकरेंनी केली आहे. तर त्यांना रोखत भाजपने कोकणी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मास्टर प्लॅन आखला होता. त्यांनी मुंबईत कोकणी मतांची धुरा खासदार नारायण राणेंच्या खांद्यावर सोपवली होती. ठाकरेंनी शह देण्यासाठी ही रणनीती आखली होती. यामुळे सध्या भाजपमध्ये मुंबईत उत्साहाचे वातावरण तयार झाले असतानाच नारायण राणेंनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान नारायण राणेंनी आणखी एक धक्कादायक किस्साही सांगितल्याने आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

रायगडसह सोलापुरमध्ये राजकीय वादातून दोघांच्या हत्या झाल्या आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सिंधुदुर्ग येथे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या भाषणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी 'मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण त्यावेळी बाळासाहेबांनी मला समजावलं आणि मी त्याला जीवनदान दिले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित कणकवलीतील सभेत त्यांनी हा किस्सा सांगितला.

हा किस्सा सांगताना ते म्हणाले की, माझ्या एका मित्राने मला रोखले होते. त्याने मला, नेहमीच्या रस्त्याने एकटा निघू नकोस, आम्ही येतोय. तू जायचं नाही. एकाने तुझी टीप दिलीय. टीप देण्याऱ्याचं नाव मला माहित झालंय. यानंतर मी त्यांना बोललो की, मी लगेच येतोय. मी लगेच गाडी काढली आणि थेट त्या माणसाच्या घरी गेलो. मी दरवाजा वाजवला. ते घर उपशाखाप्रमुखाचे होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने मधला दरवाजा उघडला. त्याचवेळी मी म्हणालो, तुझ्या पतीला मी ठार मारणार.

Balasaheb Thackeray and Narayan Rane
Narayan Rane : दोन मुलं राजकारणात स्थिरावली; आता भाजपचे राणे म्हणतात, 'नांदा सौख्य भरे'!

यानंतर ही माहिती बाळासाहेंबाना कळली आणि त्यांनी मला बोलावलं. मी तिकडे गेलो तेव्हा तो उपशाखाप्रमुखही तेथे होता. त्यावेळी बाळासाहेबांनी मला विचारलं की तू याला मारणार होतास? त्याच्या घरी जावून त्याच्या पत्नीला याला ठार मारणार अशी धमकी दिलीस. तेव्हा मी म्हणालो हो याला ठार मारणार. तेंव्हा बाळासाहेब यांनी मी विचारत असतानाही तू त्याला ठार मारणार म्हणतोस.

यावर पुन्हा मी म्हणालो हो... कारण याने मला मारण्यासाठी दाऊदच्या माणसाला टीप द्यायची ठरवलं. मग मी याला कसा जिवंत ठेवू. मी मरण्यापेक्षा मी याला ठार करतो, असे म्हणालो. यावर बाळासाहेब म्हणाले की, नारायण माझी तुला विनंती आहे, मी तुला सांगतोय, तू याला सोड, त्याला जीवनदान दे. त्यांच्या त्या शब्दानंतर, मीही साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल म्हणत त्याला जीवनदान दिले.

दरम्यान नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत देताना विरोधकांसह राणे संपण्याची वाट पाहणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी आपण संपणारे नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती आणि नाही. मी लोकसेभवर जाण्याआधीच मला तिकीट नको होते. तसे मी पक्षाला सांगितलेही होते.

पण नड्डा यांनी आम्ही तुम्हाला राजकारणातून बाहेर पडू देणार नाही असे म्हणत लोकसभेचे तिकीट दिले. यामुळेच मी घमेंडखोर आहे, मी मला कोणापेक्षा कमी मानत नाही. मला त्याचा अभिमान वाटतो. पण आता कुठेतरी थांबायला पाहिजे, असं वाटतं. मात्र जे राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो की, राणे संपणारा नसून तो सगळ्यांना पुरून उरला आहे. माझी रास गुरू असून ती स्ट्राँग आहे. मी फक्त कार्यकर्त्यांना सांगायला आलो आहे की राणे संपणार नाही. कुटुंब म्हणून राणे कुटुंब एकत्र आहोत.

Balasaheb Thackeray and Narayan Rane
Narayan Rane : दोन मुलांचा राडा लांबून बघणाऱ्या नारायण राणेंची अखेर रणांगणात एन्ट्री : जिल्हा परिषदेसाठी जोडणी लावणार

FAQs :

Q1. नारायण राणेंनी कोकणात कोणता कार्यक्रम घेतला?
➡️ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला.

Q2. राणेंनी राजकारणाबाबत काय संकेत दिले?
➡️ त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

Q3. राणेंनी कोणता धक्कादायक खुलासा केला?
➡️ एका उपशाखाप्रमुखाची हत्या करण्याचा विचार होता, पण बाळासाहेब ठाकरे यांनी समजावल्याचं सांगितलं.

Q4. हा कार्यक्रम कुठे झाला?
➡️ कणकवली येथे हा कार्यक्रम पार पडला.

Q5. या वक्तव्यामुळे राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?
➡️ राणेंच्या वक्तव्यामुळे कोकणासह राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com