नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मोठा धक्का; मतदानाचा हक्कच ‘डिलिट’, सरळ न्यायालयात धाव!

local body election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत असून नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मोठा धक्का; मतदानाचा हक्कच ‘डिलिट’, सरळ न्यायालयात धाव!
Published on
Updated on
Summary

• नगरसेवक पदासाठी इच्छुक आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्त्याचेच नाव अचानक मतदार यादीतून गायब झाले आहे.
• निवडणुकीच्या तोंडावर फाटक यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे.
• हा प्रकार प्रशासनाची चूक की राजकीय दबाव, याबाबत स्थानिक स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Ratnagiri News : वोट चोरीवरून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देशभरात वातावरण तापवत आहेत. तसेच राज्यात देखील काँग्रेसकडून बोगस मतदार आणि वोट चोरीवरून निवडणूक आयोगासह भाजपला घेरलं आहे. अशातच नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्याच इच्छुक उमेदवाराला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. या इच्छुकाचे मतदार यादीतून नावच हटवल्याने आता त्यांनी तात्काळ न्यायालयात धाव घेतल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात व्होट चोरी आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार रणकंदण माजले आहे. नुकताच मविआ आणि मनसेनं सत्याच्या मोर्चात दुबार मतदारांचे गठ्ठे सादर करत हा मुद्दा जनतेच्या समोर आणला होता. त्यामुळे भाजपने देखील पलटवार करत याला हिंदू-मुस्लीमचा रंग देण्याचा प्रयत्न केला होता.

पण आता निवडणूक आयोगाच्या मतदार प्रक्रियेत मोठा गोरख धंदा आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत उघडकीस आल्याने एकच प्रश्न चिन्ह उभा झाला आहे. येथे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते गुरुप्रसाद सुधीर फाटक यांनी प्रभाग क्र. ८ मधून नगरसेवक पदासाठी जोरदार तयारी केली होती. ते येथून लढण्यासाठी इच्छुक होते.

नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मोठा धक्का; मतदानाचा हक्कच ‘डिलिट’, सरळ न्यायालयात धाव!
Local Body Election : भाजपकडून मोठी कारवाई! मादनाईकांना कट्टर विरोधकांची मैत्री भोवली, पक्षाने नोटीस धाडत दिली तंबी

आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेना आणि विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. त्याप्रमाणे प्रभाग क्र. ८ मधून नगरसेवक पदासाठी फाटक यांनी भक्कम तयारी करत इच्छुक उमेदवार म्हणून भाजप कार्यालयात अर्जही सादर केला होता. मात्र फाटक यांचे नाव ऐनवेळी मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यांचे नाव अनेक वर्षांपासून याच प्रभागाच्या मतदार यादीत असून अगदी अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी याच प्रभागाच्या मतदान यादीवरून मतदान केले होते. पण आता नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांना उमेदवारी अर्जच भरता येणार नसल्याचे आता समोर आले असून त्यांनी या अन्यायाविरोधात तात्काळ न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान आता रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. लांजा, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड पाठोपाठ रत्नागिरी नगर पालिकेतही शिंदेंची शिवसेना व भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष उघड उघड समोर येत आहे. येथे अद्याप युतीची घोषणा झालेली नसतानाच शिवसेनेकडून 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महायुतीत नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे.

नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मोठा धक्का; मतदानाचा हक्कच ‘डिलिट’, सरळ न्यायालयात धाव!
Local Body Election 2025: पक्षाचे तिकीट न मिळालेल्यांना एसटीची हटके ऑफर! दिलीप वळसे पाटलांनाही हसू आवरता आले नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com