Local Body Election : भाजपकडून मोठी कारवाई! मादनाईकांना कट्टर विरोधकांची मैत्री भोवली, पक्षाने नोटीस धाडत दिली तंबी

BJP Issues Show-Cause Notice to Savkar Madnaik : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नुकताच भाजपवासी झालेल्या माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांना मोठा धक्का बसला आहे.
Savkar Madnaik
Savkar Madnaiksarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपने जिल्ह्यातील चार महत्वाच्या नेत्यांना पक्षविरोधी भूमिकेमुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

  2. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या कारवाईमुळे जिल्हा राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  3. पक्षात शिस्तभंगाचे प्रकरण उफाळून आल्यानंतर पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

Kolhapur News : भाजप नेते, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांना पक्ष विरोधी भूमिका नडली असून जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीबरोबर हातमिळवणी करणे अंगलट आले आहे. त्यांच्या या पक्षविरोधी भूमीकेवरून भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निंबाळकर यांनी मादनाईक यांच्यांसह जयसिंगपूर भाजपचे माजी मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, शैलेश आडके यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून गेल्या सहा महिन्यांपूर्वी मादनाईक यांनी भाजप प्रवेश केला होता. विधानसभेचे उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीबरोबर हातमिळवणी करणे त्यांना आता अंगलट आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी मादनाईक, भिडे, यळगूडकर आणि आडके यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष अथवा पक्ष श्रेष्ठींनी नगरपालिका निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला नाही. तरीही शाहू आघाडीच्या पत्रकार बैठकीत प्रसार माध्यमातून भाजपने त्यांच्यासोबत युती केली आहे असे दिशाभूल करणारे पक्ष विरोधी वक्तव्य केले आहे.

Savkar Madnaik
Kolhapur Politics : विधानपरिषदेसाठी महाडिकांनी पहिला डाव टाकला, सावकार मादनाईकांना भाजपमध्ये खेचणार

वरिष्ठांच्या मार्गदर्शनावरून शिस्तभंग कारवाई म्हणून आपणास पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये याचा खुलासा करावा. यापुढे लेखी खुलासा घेऊन पक्षाच्या शिस्तभंग समितीसमोर म्हणणे मांडत नाही, तोपर्यंत पक्षाची कोणतीही भूमिका प्रसार माध्यमांसमोर व्यक्त करणे, पक्ष नेतृत्वाचे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह, स्कार्फ, मफलर याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

आपली कोणतीही भूमिका व वक्तव्य हे अधिकृत असणार नाही. त्यास पक्षाची मान्यता असणार नाही. तसे निदर्शनास आल्यास कोणतेही कारण न देता आपणास पदमुक्त व सभासद रद्द करून निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Savkar Madnaik
सदाभाऊंना 'स्वाभिमानी'मध्ये सन्मानाने परत घेतले जाऊ शकते? 

FAQs :

1. मादनाईक यांना नोटीस का देण्यात आली?
→ पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप असल्याने भाजपने कारवाई केली.

2. आणखी कोणत्या नेत्यांना नोटीस देण्यात आली आहे?
→ मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर आणि शैलेश आडके यांनाही नोटीस बजावली आहे.

3. या नोटीसमुळे जिल्ह्यात काय प्रतिक्रिया आहेत?
→ मोठी खळबळ उडाली असून भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

4. नेत्यांना उत्तर देण्यासाठी किती वेळ दिला आहे?
→ साधारणतः अशा नोटीसमध्ये काही दिवसांची मुदत दिली जाते; पुढील निर्णय उत्तरानुसार घेतला जातो.

5. यामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
→ गटबाजी वाढण्याची शक्यता असून निवडणूक रणनीतीवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com